सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात 

सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. सहा टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि जत अर्बन बॅंकेसह १७३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील.

त्यापैकी ७३ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या निश्‍चित झाल्या आहेत. त्यामुळे १८ जानेवारीपासून १५ दिवसांत त्यांचा निवडणूक कार्यक्रम निश्‍चित केला जाईल. तसेच इतर संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील, त्या टप्प्यापासून त्या सुरू होतील. 

राज्यातील जिल्हा बॅंका व विकास सोसायटींची निवडणूक राज्य शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये पुढे ढकलली होती. शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता यासाठी कर्जमाफीशी संबंधित जिल्हा बॅक व विकास सोसायट्यांच्या निवडणूका शासनाने लांबणीवर टाकल्या होत्या.
ज्या संस्थांचे निवडणूक कार्यक्रम सुरू होते ते त्याच टप्प्यावर थांबवण्यात आले. यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह जिल्ह्यातील ७४ सहकारी संस्थांचा समावेश होता. 
मार्चमध्ये कोरोनाचे संकट सुरू झाले.

यानंतर शासनाने सर्वच सहकारी संस्थांची निवडणूक सप्टेंबर २०२० अखेर, पुन्हा डिसेंबर २०२० अखेर लांबणीवर टाकली. दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. काही राज्यातील सार्वत्रिक निवडणूक व महाराष्ट्रातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणूक घेण्यात आली. तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याची मागणी होत होती.

जिल्ह्यात मुदत संपलेल्या १ हजार ५२८ सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यांत पूर्ण केल्या जाणाऱ्या आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोविडमुळे थांबलेल्या १७३ संस्थांच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९पर्यंत मुदत संपलेल्या सहा संस्थांच्या निवडणुका, तिसऱ्या टप्प्यात ६७२ संस्थांच्या, चौथ्या टप्प्यात २०४ संस्थांच्या, पाचव्या टप्प्यात २२३ संस्थांच्या आणि सहाव्या टप्प्यात २५० संस्थांच्या निवडणुका होतील.

News Item ID: 
820-news_story-1610804584-awsecm-358
Mobile Device Headline: 
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात 
Appearance Status Tags: 
Tajya News
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात  Elections of 173 institutions including Sangli District Bank in the first phaseसांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात  Elections of 173 institutions including Sangli District Bank in the first phase
Mobile Body: 

सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. सहा टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि जत अर्बन बॅंकेसह १७३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील.

त्यापैकी ७३ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या निश्‍चित झाल्या आहेत. त्यामुळे १८ जानेवारीपासून १५ दिवसांत त्यांचा निवडणूक कार्यक्रम निश्‍चित केला जाईल. तसेच इतर संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील, त्या टप्प्यापासून त्या सुरू होतील. 

राज्यातील जिल्हा बॅंका व विकास सोसायटींची निवडणूक राज्य शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये पुढे ढकलली होती. शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता यासाठी कर्जमाफीशी संबंधित जिल्हा बॅक व विकास सोसायट्यांच्या निवडणूका शासनाने लांबणीवर टाकल्या होत्या.
ज्या संस्थांचे निवडणूक कार्यक्रम सुरू होते ते त्याच टप्प्यावर थांबवण्यात आले. यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह जिल्ह्यातील ७४ सहकारी संस्थांचा समावेश होता. 
मार्चमध्ये कोरोनाचे संकट सुरू झाले.

यानंतर शासनाने सर्वच सहकारी संस्थांची निवडणूक सप्टेंबर २०२० अखेर, पुन्हा डिसेंबर २०२० अखेर लांबणीवर टाकली. दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. काही राज्यातील सार्वत्रिक निवडणूक व महाराष्ट्रातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणूक घेण्यात आली. तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याची मागणी होत होती.

जिल्ह्यात मुदत संपलेल्या १ हजार ५२८ सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यांत पूर्ण केल्या जाणाऱ्या आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोविडमुळे थांबलेल्या १७३ संस्थांच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९पर्यंत मुदत संपलेल्या सहा संस्थांच्या निवडणुका, तिसऱ्या टप्प्यात ६७२ संस्थांच्या, चौथ्या टप्प्यात २०४ संस्थांच्या, पाचव्या टप्प्यात २२३ संस्थांच्या आणि सहाव्या टप्प्यात २५० संस्थांच्या निवडणुका होतील.

English Headline: 
Agriculture news in marathi Elections of 173 institutions including Sangli District Bank in the first phase
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सांगली sangli निवडणूक विकास महात्मा फुले कर्जमाफी कोरोना corona महाराष्ट्र maharashtra शिक्षक यती yeti
Search Functional Tags: 
सांगली, Sangli, निवडणूक, विकास, महात्मा फुले, कर्जमाफी, कोरोना, Corona, महाराष्ट्र, Maharashtra, शिक्षक, यती, Yeti
Twitter Publish: 
Meta Keyword: 
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात Elections of 173 institutions including Sangli District Bank in the first phase
Meta Description: 
Elections of 173 institutions including Sangli District Bank in the first phase
सांगलीत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि जत अर्बन बॅंकेसह १७३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. Source link

Leave a Comment

X