साखरनिर्मितीत महाराष्ट्र, कर्नाटकची आघाडी

कोल्हापूर : देशात यंदाचा गळीत हंगाम हळूहळू गती पकडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ नोव्हेंबरअखेर सुमारे ४ लाख टन साखर जादा तयार झाली आहे. यंदा या कालावधीत २० लाख टन साखर देशात तयार झाली आहे.

महाराष्ट्र गाळपात आघाडीवर असून, २०पैकी एकट्या महाराष्ट्रात ९ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी देशात याच कालावधीत २८९ साखर कारखाने उसाचे गाळप करत होते. यंदा त्यात वाढ होऊन ही संख्या ३०८ वर पोहचली आहे. दक्षिण आणि पश्चिमेकडील अनेक साखर कारखान्यांनी या हंगामाच्या सुरुवातीला गतीने गाळप केले आहे. त्यामुळे या वर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत साखरेचे उत्पादन थोडे वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे याचा परिणाम ऊस तोडणीवर झाला. उत्तर प्रदेशातील ऊसतोडणी संथ गतीने सुरू असल्याने साखर निर्मिती घटली आहे. उत्तर प्रदेशात केवळ २.८८ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत उत्तर प्रदेशात ४ लाख टनांहून अधिक साखर तयार झाली होती. 

उत्तर प्रदेशमध्ये सध्या ७४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गेल्या हंगामात या कालावधीत ७६ कारखाने सुरू होते. यातून ४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्रात १३४ साखर कारखान्यांनी ८.९१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे, त्या तुलनेत मागील हंगामात १२० कारखान्यांनी याच तारखेअखेर ६ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. 

गेल्या वर्षी विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात हंगामाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऊसतोडीची गती संथ होती. यंदा मात्र सुरुवातीलाच साखर कारखान्यांनी वेग घेतला आहे. उत्तराखंड, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या उर्वरित राज्यांमध्ये, सुमारे २३ कारखान्यांनी  गाळप सुरू केले. आतापर्यंत ७४,००० टन साखरेचे उत्पादन केले आहे. यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशापेक्षा महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांनी साखर निर्मितीत आघाडी घेतली आहे. कर्नाटकात नोव्हेंबर मध्यापर्यंत ७.६२ लाख टन साखर तयार झाली आहे. 

२५ लाख टन साखर निर्यातीचे करार
बंदरातील माहिती आणि बाजार अहवालानुसार, आतापर्यंत सुमारे २५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. यापैकी, गेल्या वर्षीच्या याच महिन्यात निर्यात केलेल्या १.९६ लाख टन साखरेच्या तुलनेत ऑक्टोबर २१मध्ये सुमारे २.७ लाख टन साखर निर्यात झाली आहे. नोव्हेंबरमध्ये  आणखी २ लाख टन साखर निर्यात केली जाईल, अशी शक्यता ‘इस्समा’ने वर्तवली आहे.

यंदाच्या गळीत हंगामावर दृष्टिक्षेप
    महाराष्ट्रात ९ लाख टन साखर तयार
    कर्नाटकात नोव्हेंबर मध्यापर्यंत ७.६२ लाख टन साखर तयार
    उत्तर प्रदेशात केवळ २.८८ लाख टन साखर तयार
    उत्तर प्रदेशमध्ये ७४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू
    महाराष्ट्रात १३४ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू 
    उत्तराखंड, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधील २३ कारखान्यांकडून गाळप

News Item ID: 
820-news_story-1637417950-awsecm-950
Mobile Device Headline: 
साखरनिर्मितीत महाराष्ट्र, कर्नाटकची आघाडी
Appearance Status Tags: 
Mukhya News
Maharashtra, Karnataka lead in sugar productionMaharashtra, Karnataka lead in sugar production
Mobile Body: 

कोल्हापूर : देशात यंदाचा गळीत हंगाम हळूहळू गती पकडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ नोव्हेंबरअखेर सुमारे ४ लाख टन साखर जादा तयार झाली आहे. यंदा या कालावधीत २० लाख टन साखर देशात तयार झाली आहे.

महाराष्ट्र गाळपात आघाडीवर असून, २०पैकी एकट्या महाराष्ट्रात ९ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी देशात याच कालावधीत २८९ साखर कारखाने उसाचे गाळप करत होते. यंदा त्यात वाढ होऊन ही संख्या ३०८ वर पोहचली आहे. दक्षिण आणि पश्चिमेकडील अनेक साखर कारखान्यांनी या हंगामाच्या सुरुवातीला गतीने गाळप केले आहे. त्यामुळे या वर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत साखरेचे उत्पादन थोडे वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे याचा परिणाम ऊस तोडणीवर झाला. उत्तर प्रदेशातील ऊसतोडणी संथ गतीने सुरू असल्याने साखर निर्मिती घटली आहे. उत्तर प्रदेशात केवळ २.८८ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत उत्तर प्रदेशात ४ लाख टनांहून अधिक साखर तयार झाली होती. 

उत्तर प्रदेशमध्ये सध्या ७४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गेल्या हंगामात या कालावधीत ७६ कारखाने सुरू होते. यातून ४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्रात १३४ साखर कारखान्यांनी ८.९१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे, त्या तुलनेत मागील हंगामात १२० कारखान्यांनी याच तारखेअखेर ६ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. 

गेल्या वर्षी विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात हंगामाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऊसतोडीची गती संथ होती. यंदा मात्र सुरुवातीलाच साखर कारखान्यांनी वेग घेतला आहे. उत्तराखंड, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या उर्वरित राज्यांमध्ये, सुमारे २३ कारखान्यांनी  गाळप सुरू केले. आतापर्यंत ७४,००० टन साखरेचे उत्पादन केले आहे. यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशापेक्षा महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांनी साखर निर्मितीत आघाडी घेतली आहे. कर्नाटकात नोव्हेंबर मध्यापर्यंत ७.६२ लाख टन साखर तयार झाली आहे. 

२५ लाख टन साखर निर्यातीचे करार
बंदरातील माहिती आणि बाजार अहवालानुसार, आतापर्यंत सुमारे २५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. यापैकी, गेल्या वर्षीच्या याच महिन्यात निर्यात केलेल्या १.९६ लाख टन साखरेच्या तुलनेत ऑक्टोबर २१मध्ये सुमारे २.७ लाख टन साखर निर्यात झाली आहे. नोव्हेंबरमध्ये  आणखी २ लाख टन साखर निर्यात केली जाईल, अशी शक्यता ‘इस्समा’ने वर्तवली आहे.

यंदाच्या गळीत हंगामावर दृष्टिक्षेप
    महाराष्ट्रात ९ लाख टन साखर तयार
    कर्नाटकात नोव्हेंबर मध्यापर्यंत ७.६२ लाख टन साखर तयार
    उत्तर प्रदेशात केवळ २.८८ लाख टन साखर तयार
    उत्तर प्रदेशमध्ये ७४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू
    महाराष्ट्रात १३४ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू 
    उत्तराखंड, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधील २३ कारखान्यांकडून गाळप

English Headline: 
Agriculture News in Marathi Maharashtra, Karnataka lead in sugar production
Author Type: 
Internal Author
राजकुमार चौगुले
साखर कोल्हापूर पूर floods महाराष्ट्र maharashtra उत्तर प्रदेश ऊस पाऊस मात mate उत्तराखंड बिहार मध्य प्रदेश madhya pradesh कर्नाटक साखर निर्यात
Search Functional Tags: 
साखर, कोल्हापूर, पूर, Floods, महाराष्ट्र, Maharashtra, उत्तर प्रदेश, ऊस, पाऊस, मात, mate, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, कर्नाटक, साखर निर्यात
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Maharashtra, Karnataka lead in sugar production
Meta Description: 
Maharashtra, Karnataka lead in sugar production
देशात यंदाचा गळीत हंगाम हळूहळू गती पकडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ नोव्हेंबरअखेर सुमारे ४ लाख टन साखर जादा तयार झाली आहे. यंदा या कालावधीत २० लाख टन साखर देशात तयार झाली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X