[ad_1]
मुंबई : गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील जेटी उभारणीसाठी वाढीव निधीबाबत लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. जर मत्स्य आयुक्तांनी निधी देण्यास नकार दिला, तर त्यांना रजेवर पाठवू, असेही पवार म्हणाले.
गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील जेटी उभारणीसाठी गेल्या ११ वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. २ कोटी ९७ लाख रुपयांचे काम आता ८ कोटींवर गेले आहे. मत्सव्यवसाय आयुक्त या कामासाठी एक रुपया देणार नाहीत, असे सांगत आहेत. मंत्री गोलमटोल उत्तरे देत आहेत. जर हे साधे साधे प्रश्न सुटणार नसतील, तर सभागृहात कशाला बसायचे, असा उद्विग्न सवाल शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी विचारला. जाधव यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर भाजपच्या आशिष शेलार, योगेश सागर यांनीही सहभाग घेत चर्चा केली.
मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत हे काम प्रस्तावित होते. ज्या ठिकाणी कामाला मंजुरी मिळाली तेथे स्थानिकांचा विरोध होता. जागा बदलली तेथे खडकाळ भाग होता. त्यामुळे कामाचा खर्च वाढला. हे काम सुरू करण्याआधी सीआरझेडची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र ती घेतली गेली नव्हती. त्यामुळे काम थांबले.
शेख यांच्या उत्तरावर जाधव यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘मंत्र्यांचे उत्तर हे दिशाभूल करणारे आहे. त्यांना अधिकाऱ्यांनी माहितीच दिलेली नाही. या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. त्यामुळे त्यासाठी निधी कसा देणार आणि कुठून देणार हा मोठा प्रश्न आहे. जर सीआरझेडची परवानगी नव्हती तर टेंडर प्रक्रिया का राबविली? सीआरझेडची परवानगी घ्यायची जबाबदारी विभागाची आहे की मच्छिमारांची? अंधळा कारभार करून हे काम रखडवले आहे.’’
भास्कर जाधव यांनी मत्स्यआयुक्त अतुल पाटणे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, पाटणे यांना या कामासाठी भेटलो असता त्यांनी या कामासाठी एक रुपयाही देणार नाही असे सांगितले.

[ad_2]
Source link