साखर उद्योगात वेगाने बदल

पुणे ः राज्यातील सहकारी साखर कारखाने सध्या इथेनॉल निर्मितीकडे झपाट्याने झुकत आहेत. मात्र कारखान्यांसाठी इथेनॉल हाच एकमेव पर्याय नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. धान्यावर आधारित इथेनॉलनिर्मिती आणि इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, अशा दोन उद्योगांची देशात पायाभरणी सुरू आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखान्यांच्या इथेनॉल प्रकल्पांना एकाच वेळी दोन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले, ‘‘व्हीएसआयच्या सर्वसाधारण सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेले मार्गदर्शन साखर उद्योग, साखर कारखाने आणि सहकारी बॅंकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. या तीनही घटकांना भविष्यात तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आस्तित्वाची लढाई देखील अतिशय निकराने लढावी लागणार आहे.

ऊस लावा, खरेदी करा, साखर तयार करा, गोदाम ठेवा आणि विकत राहा, अशा साखळीत वर्षानुवर्षे चालू असलेल्या साखर कारखान्यांच्या कामकाजाला आता वेगाने बदलावे लागेल. भविष्यात साखरनिर्मिती कमी होत जाणार असल्याने साखरेवर आधारित सध्याची सर्व व्यवस्था व नियोजनदेखील बदलावे लागणार आहे.’’ 

बँकांना व्याज कमी द्यावे लागणार
इथेनॉलची निर्मिती आता ‘बी’ हेवी मळी, ‘सी’ हेवी मळी, उसाचा रस आणि पाक यापासून करता येते. हे चारही पर्याय आता कारखान्यांना पूर्ण क्षमतेने वापरावे लागतील. दुसऱ्या बाजूला साखरेचे उत्पादन सतत घटते ठेवावे लागेल. त्यामुळे भरपूर साखर तयार करून गोदामात ठेवा आणि बॅंकांचे व्याज भरत बसा असा पारंपरिक पर्याय आता कारखान्यांसाठी खर्चिक ठरेल. इथेनॉल विकताच त्याचे बिल २१ दिवसांत सरकारी तेल विपणन कंपन्या जमा करतात. त्यामुळे साखरेच्या पोत्यावर भरसमाट व्याज देत बसणे आता यापुढे शक्य होणार नाही. सहकारी बॅंकांची काळजी त्यामुळे वाढलेली आहे, असेही नाईकनवरे यांनी सांगितले. 

धान्य आधारित इथेनॉल असेल मुख्य स्पर्धक
इथेनॉलनिर्मितीचा पर्यायदेखील साखर कारखान्यांसाठी अंतिम ठरणार नाही, असेही चित्र आता पुढे येत आहे. कारण २०२५अखेर केंद्र शासनाला इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (ईबीपी) पूर्ण क्षमतेने राबविण्यासाठी १५०० कोटी लिटर इथेनॉल हवे आहे. साखर कारखान्यांनी काहीही केले तरी तोपर्यंत केवळ ७००-७५० कोटी लिटरचा पुरवठा करण्याची क्षमता कारखान्यांची राहील. त्यामुळे उर्वरित ७०० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा हा साखर उद्योगातून नव्हे; तर अन्य उद्योगांकडून येईल, असे आता स्पष्ट होत आहे. हा पुरवठा मुख्यत्वे निरुपयोगी धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा राहील. त्यामुळे धान्यावर आधारित इथेनॉल (ग्रेन बेस्ड) निर्मिती प्रकल्प भविष्यात साखर कारखान्यांचे मुख्य स्पर्धक बनण्याची शक्यता आहे.

इथेनॉलला मर्यादित वाव
इलेक्ट्रॉनिक्स वाहननिर्मिती उद्योगाची मोठी पायाभरणी देशात होते आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोलसह इथेनॉलच्या वापरावर देखील मर्यादा येतील. कारण इलेक्ट्रॉनिक्स वाहनांची बाजारपेठ येत्या एक दशकात गरुडझेप घेण्याच्या स्थितीत आलेली असेल. या बाजारपेठेचा विस्तार जसाजसा होईल त्या प्रमाणात इथेनॉलचे महत्त्व देखील मर्यादित होत जाईल, असे मत साखर उद्योगातील जाणकारांचे आहे. 

News Item ID: 
820-news_story-1641394330-awsecm-947
Mobile Device Headline: 
साखर उद्योगात वेगाने बदल
Appearance Status Tags: 
Mukhya News
Rapid changes in the sugar industry
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi Rapid changes in the sugar industry
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
साखर इथेनॉल ethanol पुणे शरद पवार sharad pawar ऊस वर्षा varsha मका maize व्याज मात mate सरकार government
Search Functional Tags: 
साखर, इथेनॉल, ethanol, पुणे, शरद पवार, Sharad Pawar, ऊस, वर्षा, Varsha, मका, Maize, व्याज, मात, mate, सरकार, Government
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rapid changes in the sugar industry
Meta Description: 
Rapid changes in the sugar industry
राज्यातील सहकारी साखर कारखाने सध्या इथेनॉल निर्मितीकडे झपाट्याने झुकत आहेत. मात्र कारखान्यांसाठी इथेनॉल हाच एकमेव पर्याय नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment