सातारा जिल्हा बँकेवर  मकरंद पाटील, राजपुरे, खर्डेकर बिनविरोध 

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या अखेरच्या दिवशी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २०० अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारच्या अखेरच्या दिवशी खरेदी-विक्री मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील, महाबळेश्‍वर सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे आणि कृषी उत्पादन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने ते बिनविरोध झाले असून, त्याची अधिकृत घोषणा अर्ज माघारीनंतर होणार आहे. 

जिल्हा बॅंकेची निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी रंगतदार वळणावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी चार जागा वगळता उर्वरित सर्व मतदारसंघांतून उमेदवार दिले आहेत, तसेच शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनीही बहुतांशी मतदारसंघांत उमेदवार दिल्याने त्यांचेही स्वतंत्र पॅनेल होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीच्या विरोधात गोरे बंधूंची दोन पॅनेल उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बाबतचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. 

राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह नेत्यांनी एकत्र उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या निवडक समर्थकांसह आले व त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे शासकीय विश्रामगृहात थांबले होते. तेथून शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्त्यांसह दोघे जिल्हा बॅंकेत चालत आले. तेथे त्यांनी एकत्र सर्व अर्ज दाखल केले.

दोन-चार जागा वगळता उर्वरित सर्व ठिकाणी त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात भाजप प्रणीत सर्वसमावेशक पॅनेल टाकण्याचा निर्धार केला आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते शेखर गोरे त्यांच्या समर्थकांसह जिल्हा बॅंकेत दाखल झाले. त्यांनीही स्वत:सह इतर बहुतांशी जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनीही तिसरे पॅनेल उभे करण्याचे सूतोवाच केले आहे. दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची जिल्हा बॅंकेत गर्दी झाली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असतानाही जिल्हा बॅंकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी झाल्याचे दिसत होते.  

News Item ID: 
820-news_story-1635251217-awsecm-944
Mobile Device Headline: 
सातारा जिल्हा बँकेवर  मकरंद पाटील, राजपुरे, खर्डेकर बिनविरोध 
Appearance Status Tags: 
Section News
सातारा जिल्हा बँकेवर  मकरंद पाटील, राजपुरे, खर्डेकर बिनविरोध  On Satara District Bank Makrand Patil, Rajpure, Khardekar unopposedसातारा जिल्हा बँकेवर  मकरंद पाटील, राजपुरे, खर्डेकर बिनविरोध  On Satara District Bank Makrand Patil, Rajpure, Khardekar unopposed
Mobile Body: 

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या अखेरच्या दिवशी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २०० अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारच्या अखेरच्या दिवशी खरेदी-विक्री मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील, महाबळेश्‍वर सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे आणि कृषी उत्पादन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने ते बिनविरोध झाले असून, त्याची अधिकृत घोषणा अर्ज माघारीनंतर होणार आहे. 

जिल्हा बॅंकेची निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी रंगतदार वळणावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी चार जागा वगळता उर्वरित सर्व मतदारसंघांतून उमेदवार दिले आहेत, तसेच शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनीही बहुतांशी मतदारसंघांत उमेदवार दिल्याने त्यांचेही स्वतंत्र पॅनेल होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीच्या विरोधात गोरे बंधूंची दोन पॅनेल उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बाबतचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. 

राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, तसेच शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह नेत्यांनी एकत्र उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या निवडक समर्थकांसह आले व त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे शासकीय विश्रामगृहात थांबले होते. तेथून शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्त्यांसह दोघे जिल्हा बॅंकेत चालत आले. तेथे त्यांनी एकत्र सर्व अर्ज दाखल केले.

दोन-चार जागा वगळता उर्वरित सर्व ठिकाणी त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात भाजप प्रणीत सर्वसमावेशक पॅनेल टाकण्याचा निर्धार केला आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते शेखर गोरे त्यांच्या समर्थकांसह जिल्हा बॅंकेत दाखल झाले. त्यांनीही स्वत:सह इतर बहुतांशी जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनीही तिसरे पॅनेल उभे करण्याचे सूतोवाच केले आहे. दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची जिल्हा बॅंकेत गर्दी झाली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असतानाही जिल्हा बॅंकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी झाल्याचे दिसत होते.  

English Headline: 
Agriculture News in Marathi On Satara District Bank Makrand Patil, Rajpure, Khardekar unopposed
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
आमदार निवडणूक जयकुमार गोरे खासदार बाळ baby infant शेखर गोरे shekhar gore रामराजे नाईक निंबाळकर ramraje nimbalkar शशिकांत शिंदे शिवेंद्रसिंहराजे भोसले उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale प्रदर्शन भाजप कोरोना corona
Search Functional Tags: 
आमदार, निवडणूक, जयकुमार गोरे, खासदार, बाळ, baby, infant, शेखर गोरे, Shekhar Gore, रामराजे नाईक निंबाळकर, Ramraje Nimbalkar, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदयनराजे, उदयनराजे भोसले, Udayanraje Bhosale, प्रदर्शन, भाजप, कोरोना, Corona
Twitter Publish: 
Meta Keyword: 
On Satara District Bank Makrand Patil, Rajpure, Khardekar unopposed
Meta Description: 
On Satara District Bank
Makrand Patil, Rajpure, Khardekar unopposed
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या अखेरच्या दिवशी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २०० अर्ज दाखल झाले आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X