[ad_1]
सातारा : रब्बी हंगाम सर्वच बँकांनी पीककर्ज वितरण करण्याकडे लक्ष दिल्यामुळे उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप झाले आहे. मार्चअखेर जिल्ह्यात उद्दिष्टाचा १४४ टक्के पीककर्ज वितरण करीत वेगवेगळ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
खरीप हंगामात जिल्हा बँकेने सर्वाधिक १३६ टक्के पीककर्ज वितरण करीत आघाडी घेतली होती. खरिपात राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वितरणाकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली होती. जिल्ह्यातील २० राष्ट्रीयकृत बँकांनी अवघे ६४ टक्के पीककर्ज वितरण केले होते. मात्र रब्बी हंगामात राष्ट्रीयकृत बँकांनी ही सुधारत पीककर्ज वितरणात हात सैल केला आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ६०० कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी सर्व बँकांनी मिळून ८६५ कोटी ६२ लाख रुपये म्हणजेच १४४ टक्के वितरण करण्यात आले. राष्ट्रीयकृत बँकांना १८७ कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मार्चअखेर या बँकांनी २४९ कोटी पाच लाख रुपयांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या १३३ टक्के कर्जवाटप केले. खासगी बँकाच्या कर्ज वितरणात सुधारणा झाली आहे. या बँकांना ६२ कोटी ४० लाखांच्या उद्दिष्टापैकी ४७ कोटी ९५ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या ७७ टक्के कर्ज वितरण केले आहे.
जिल्हा बॅंकेची आघाडी कायम
खरीप तसेच रब्बी हंगामात जिल्हा बँकेची आघाडी कायम आहे. सातारा जिल्हा बँकेस ३५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा बँकेने ५६८ कोटी २४ लाख रुपयांचे म्हणजेच १६२ टक्के कर्जवाटप केले आहे. खरिपात या बँकेने १,२९४ कोटी ८५ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या १३६ टक्के पीककर्ज वितरण केले होते.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.