साताऱ्यात महागाईविरोधात काँग्रेसची रॅली

कऱ्हाड, जि. सातारा ः भाजप हटाओ, देश बचाओ…, पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, पृथ्वीराज बाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…, अशा घोषणांनी शहरातील परिसर दणाणून गेला. काँग्रेसने महागाईच्या विरोधात काढलेल्या रॅलीला सोमवारी (ता. १५) मोठा प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत बैलगाडीतून सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहात होते. 

काँग्रेसतर्फे महागाई विरोधात जनजागरण अभियान सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून शहरात काँग्रेस पक्षाची महागाई विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष राजेंद्र माने, मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडानाना जगताप, विद्याताई थोरवडे, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, इंद्रजित चव्हाण, नगरसेवक इंद्रजित गुजर, सागर जाधव, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष झाकिर पठाण, जावेद शेख, गणेश गायकवाड अमीर कटापुरे यांच्यासह महिला उपस्थित होते. 

कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वळसा घालून रॅलीचा समारोप येथील तहसीलदार कार्यालयासमोर झाला. तेथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार रॅलीचे आयोजन केले होते. पंधरा दिवस अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याव्दारे केंद्रामुळे निर्माण झालेली महागाई व अर्थव्यवस्थेची दुरवस्थेची माहिती जनतेपर्यंत पोचवली जाणार आहे.

News Item ID: 
820-news_story-1636982638-awsecm-989
Mobile Device Headline: 
साताऱ्यात महागाईविरोधात काँग्रेसची रॅली
Appearance Status Tags: 
Section News
Congress rally against inflation in SataraCongress rally against inflation in Satara
Mobile Body: 

कऱ्हाड, जि. सातारा ः भाजप हटाओ, देश बचाओ…, पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, पृथ्वीराज बाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…, अशा घोषणांनी शहरातील परिसर दणाणून गेला. काँग्रेसने महागाईच्या विरोधात काढलेल्या रॅलीला सोमवारी (ता. १५) मोठा प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत बैलगाडीतून सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहात होते. 

काँग्रेसतर्फे महागाई विरोधात जनजागरण अभियान सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून शहरात काँग्रेस पक्षाची महागाई विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष राजेंद्र माने, मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडानाना जगताप, विद्याताई थोरवडे, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, इंद्रजित चव्हाण, नगरसेवक इंद्रजित गुजर, सागर जाधव, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष झाकिर पठाण, जावेद शेख, गणेश गायकवाड अमीर कटापुरे यांच्यासह महिला उपस्थित होते. 

कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वळसा घालून रॅलीचा समारोप येथील तहसीलदार कार्यालयासमोर झाला. तेथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार रॅलीचे आयोजन केले होते. पंधरा दिवस अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याव्दारे केंद्रामुळे निर्माण झालेली महागाई व अर्थव्यवस्थेची दुरवस्थेची माहिती जनतेपर्यंत पोचवली जाणार आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Congress rally against inflation in Satara
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कऱ्हाड karhad भाजप पेट्रोल काँग्रेस indian national congress महागाई मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan मलकापूर नगर नरेंद्र पाटील narendra patil नगरसेवक कोल्हापूर शिवाजी महाराज shivaji maharaj तहसीलदार जवाहरलाल नेहरू
Search Functional Tags: 
कऱ्हाड, Karhad, भाजप, पेट्रोल, काँग्रेस, Indian National Congress, महागाई, मुख्यमंत्री, आमदार, पृथ्वीराज चव्हाण, Prithviraj Chavan, मलकापूर, नगर, नरेंद्र पाटील, Narendra Patil, नगरसेवक, कोल्हापूर, शिवाजी महाराज, Shivaji Maharaj, तहसीलदार, जवाहरलाल नेहरू
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Congress rally against inflation in Satara
Meta Description: 
Congress rally against inflation in Satara
काँग्रेसने महागाईच्या विरोधात काढलेल्या रॅलीला सोमवारी (ता. १५) मोठा प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत बैलगाडीतून सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहात होते.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X