Take a fresh look at your lifestyle.

सावदा, जि. जळगाव : केळी व्यापारात फसवणुकीचा ‘गोरखधंदा’ 

0

सावदा, जि. जळगाव : कधी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर कधी दराचा फटका तर व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा झटका, या केळी व्यवसायातील नित्याच्या बाबी बनल्या आहेत. आता तर काही तथाकथित केळी व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. 

सावदा परिसर ही केळीची मोठी बाजारपेठ आहे. या व्यवसायात दररोज लाखो कोटींची उलाढाल होत असते. याचाच फायदा घेत जिल्ह्यात बोगस व्यापाऱ्यांची मोठी वाढ झाली आहे. त्यातच मालाला योग्य भाव मिळत नाही. याचा गैरफायदा घेऊन काही व्यापारी हे स्वतःला मोठा व्यापारी भासवून जादा दराचे आमिष दाखवून केळी उत्पादकांची फसवणूक करीत आहेत.

फसवणुकीच्या इराद्याने हे तथाकथित केळी व्यापारी बाजारभावापेक्षा थोडा अधिक भाव देऊन शिवाय एक ते दोन चलन रोखीने देऊन माल खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास बसतो. आणि मग इतर शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचे पाहून अन्य शेतकरीही आपला माल अशा व्यापाऱ्यांना देण्यास तयार होतात. नंतर मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्याची लाखोंत फसवणूक केली जात आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या तक्रारीत वाढ होऊन अनेक प्रकरणे समोर येत आहे. याबाबत पोलिसात तक्रार केली तरी व्यवहाराचे फारसे पक्के पुरावे नसल्याने काही निष्पन्न होताना दिसत नाही. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचा कोणत्याही प्रकारचा व्यापारी म्हणून परवाना न काढता राजरोसपणे काही कमिशन एजंट व्यापारी होऊन शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करीत आहेत. अशा बोगस व्यापाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करावी, अशी फसवणूक झालेले शेतकरी मागणी करीत आहे. 

ओळखीचा घेतात फायदा
बोगस व्यापारी सुरुवातीला ओळख करून घेतात. एक ते दोन वेळा रोखीने केळी कापणी करतात. तिसऱ्या वेळा केळी कापणी केल्यावर अर्धे पैसे देऊन बाकी पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकतो, असे सांगून एक, दोन महिन्यांपर्यंत वेगवेगळी कारणे सांगून बोगस व्यापारी वेळ मारून नेतात व पुढे तो व्यापारी मिळतच नाही. हे बोगस व्यापारी वर्षभरात दहा ते पंधरा शेतकऱ्यांची फसवणूक करून मोकळे होत आहेत. नवीन व्यापाऱ्याकडे बाजार समितीचा परवाना आहे का, हे तपासून घेतले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

News Item ID: 
820-news_story-1637665144-awsecm-493
Mobile Device Headline: 
सावदा, जि. जळगाव : केळी व्यापारात फसवणुकीचा ‘गोरखधंदा’ 
Appearance Status Tags: 
Section News
Banana trade fraud scandalBanana trade fraud scandal
Mobile Body: 

सावदा, जि. जळगाव : कधी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर कधी दराचा फटका तर व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा झटका, या केळी व्यवसायातील नित्याच्या बाबी बनल्या आहेत. आता तर काही तथाकथित केळी व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. 

सावदा परिसर ही केळीची मोठी बाजारपेठ आहे. या व्यवसायात दररोज लाखो कोटींची उलाढाल होत असते. याचाच फायदा घेत जिल्ह्यात बोगस व्यापाऱ्यांची मोठी वाढ झाली आहे. त्यातच मालाला योग्य भाव मिळत नाही. याचा गैरफायदा घेऊन काही व्यापारी हे स्वतःला मोठा व्यापारी भासवून जादा दराचे आमिष दाखवून केळी उत्पादकांची फसवणूक करीत आहेत.

फसवणुकीच्या इराद्याने हे तथाकथित केळी व्यापारी बाजारभावापेक्षा थोडा अधिक भाव देऊन शिवाय एक ते दोन चलन रोखीने देऊन माल खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास बसतो. आणि मग इतर शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचे पाहून अन्य शेतकरीही आपला माल अशा व्यापाऱ्यांना देण्यास तयार होतात. नंतर मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्याची लाखोंत फसवणूक केली जात आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या तक्रारीत वाढ होऊन अनेक प्रकरणे समोर येत आहे. याबाबत पोलिसात तक्रार केली तरी व्यवहाराचे फारसे पक्के पुरावे नसल्याने काही निष्पन्न होताना दिसत नाही. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचा कोणत्याही प्रकारचा व्यापारी म्हणून परवाना न काढता राजरोसपणे काही कमिशन एजंट व्यापारी होऊन शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करीत आहेत. अशा बोगस व्यापाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करावी, अशी फसवणूक झालेले शेतकरी मागणी करीत आहे. 

ओळखीचा घेतात फायदा
बोगस व्यापारी सुरुवातीला ओळख करून घेतात. एक ते दोन वेळा रोखीने केळी कापणी करतात. तिसऱ्या वेळा केळी कापणी केल्यावर अर्धे पैसे देऊन बाकी पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकतो, असे सांगून एक, दोन महिन्यांपर्यंत वेगवेगळी कारणे सांगून बोगस व्यापारी वेळ मारून नेतात व पुढे तो व्यापारी मिळतच नाही. हे बोगस व्यापारी वर्षभरात दहा ते पंधरा शेतकऱ्यांची फसवणूक करून मोकळे होत आहेत. नवीन व्यापाऱ्याकडे बाजार समितीचा परवाना आहे का, हे तपासून घेतले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

English Headline: 
agriclture news in marathi,Banana trade fraud scandal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
AgencySource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X