सिंधुदुर्गनगरी : पारंपरिक ५२ भात वाणांचे बीजोत्पादन

सिंधुदुर्गनगरी ः बीजोत्पादनाच्या हेतूने जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अशा ५२ पांरपरिक भात वाणांची रानबांबुळी आणि डिगस या दोन गावांत लागवड करण्यात आली आहे. ६० शेतकऱ्यांच्या शेतात ही लागवड केली आहे. उत्पादित भातबियाणे सीड बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

एकीकडे पारंपरिक भातबियाण्यांच्या तांदळाला मोठी मिळत असताना दुसरीकडे ही भातबियाणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ॲग्रीकार्ट शेतकरी कंपनी आणि बाएफ या दोन संस्थांनी या बियाण्याचे संकलन करून त्याचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील ५६ हून अधिक भातबियाण्यांचे संकलन त्यांनी केले आहे. पारंपरिक भातबियाण्यांची सीड बँक निर्माण करण्यात आली असून, या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या वर्षी बीजोत्पादनाच्या हेतूने रानबांबुळी आणि डिगस (ता. कुडाळ) येथील ६० शेतकऱ्यांच्या शेतात भाताच्या ५२ पांरपरिक बियाण्यांची लागवड करण्यात आली. 

यामध्ये वालय, बेळा, छोटा बेळा, सोंफळा, कोंथिबीर, पाटणी, लवेसाळ, सोरटीसह विविध बियाण्यांचा समावेश आहे. ९०, ११०, १२०, ते १४० दिवस कालावधीत परिपक्व होणारी आहेत. बाएफ आणि ॲग्रीकार्टला छोटा बेळासारखी बियाणी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे येत्या काळात पांरपरिक भातबियाण्यांचे क्षेत्र वाढण्यासाठी मदत होणार आहे. या भातबियाण्यांचे क्षेत्र वाढवून त्यातून होणारे उत्पादनाचे मूल्यवर्धनाकरीता प्रयत्न केले जाणार आहेत.

‘वालय’ होणार सिंधुदुर्गचा ब्रॅण्ड
कधी काळी ताप, अशक्तपणा, आणि विविध आजारपणांत वालय, सोंफळा आणि बेळा या जातीच्या तांदळांचे पेय रुग्णांना दिले जात असे. आजारपणात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी या बियाण्यांचा वापर होत असे. त्यातील ‘वालय’ भातबियाण्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ब्रॅण्ड बनविण्याचा मानस शेतकरी कंपनी आणि बाएफचा आहे. जिल्ह्यातील ३९ गावांतून वालय जातीचे नमुने संकलित करून त्याची लागवड करण्यात आली आहे. 
 
News Item ID: 
820-news_story-1635339566-awsecm-926
Mobile Device Headline: 
सिंधुदुर्गनगरी : पारंपरिक ५२ भात वाणांचे बीजोत्पादन
Appearance Status Tags: 
Mukhya News
Seed production of 52 traditional rice varietiesSeed production of 52 traditional rice varieties
Mobile Body: 

सिंधुदुर्गनगरी ः बीजोत्पादनाच्या हेतूने जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अशा ५२ पांरपरिक भात वाणांची रानबांबुळी आणि डिगस या दोन गावांत लागवड करण्यात आली आहे. ६० शेतकऱ्यांच्या शेतात ही लागवड केली आहे. उत्पादित भातबियाणे सीड बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

एकीकडे पारंपरिक भातबियाण्यांच्या तांदळाला मोठी मिळत असताना दुसरीकडे ही भातबियाणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ॲग्रीकार्ट शेतकरी कंपनी आणि बाएफ या दोन संस्थांनी या बियाण्याचे संकलन करून त्याचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील ५६ हून अधिक भातबियाण्यांचे संकलन त्यांनी केले आहे. पारंपरिक भातबियाण्यांची सीड बँक निर्माण करण्यात आली असून, या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या वर्षी बीजोत्पादनाच्या हेतूने रानबांबुळी आणि डिगस (ता. कुडाळ) येथील ६० शेतकऱ्यांच्या शेतात भाताच्या ५२ पांरपरिक बियाण्यांची लागवड करण्यात आली. 

यामध्ये वालय, बेळा, छोटा बेळा, सोंफळा, कोंथिबीर, पाटणी, लवेसाळ, सोरटीसह विविध बियाण्यांचा समावेश आहे. ९०, ११०, १२०, ते १४० दिवस कालावधीत परिपक्व होणारी आहेत. बाएफ आणि ॲग्रीकार्टला छोटा बेळासारखी बियाणी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे येत्या काळात पांरपरिक भातबियाण्यांचे क्षेत्र वाढण्यासाठी मदत होणार आहे. या भातबियाण्यांचे क्षेत्र वाढवून त्यातून होणारे उत्पादनाचे मूल्यवर्धनाकरीता प्रयत्न केले जाणार आहेत.

‘वालय’ होणार सिंधुदुर्गचा ब्रॅण्ड
कधी काळी ताप, अशक्तपणा, आणि विविध आजारपणांत वालय, सोंफळा आणि बेळा या जातीच्या तांदळांचे पेय रुग्णांना दिले जात असे. आजारपणात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी या बियाण्यांचा वापर होत असे. त्यातील ‘वालय’ भातबियाण्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ब्रॅण्ड बनविण्याचा मानस शेतकरी कंपनी आणि बाएफचा आहे. जिल्ह्यातील ३९ गावांतून वालय जातीचे नमुने संकलित करून त्याची लागवड करण्यात आली आहे. 
 
English Headline: 
Agriculture news in Marathi Seed production of 52 traditional rice varieties
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सिंधुदुर्ग sindhudurg बीजोत्पादन seed production पुढाकार initiatives कुडाळ
Search Functional Tags: 
सिंधुदुर्ग, Sindhudurg, बीजोत्पादन, Seed Production, पुढाकार, Initiatives, कुडाळ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Seed production of 52 traditional rice varieties
Meta Description: 
Seed production of 52 traditional rice varieties
बीजोत्पादनाच्या हेतूने जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अशा ५२ पांरपरिक भात वाणांची रानबांबुळी आणि डिगस या दोन गावांत लागवड करण्यात आली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X