सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात बुधवारी (ता.१) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गुरुवारी (ता. २) सकाळपासून देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजूसह सर्वच फळपिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तर काही भागात रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी शक्यता होती. परंतु दिवसभर पाऊस पडला नाही. मात्र रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाने जिल्ह्याला अक्षरक्ष झोडपून काढले. पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या.

शेतमळ्यांमध्ये पाणीच पाणी साचले होते. सर्व तालुक्यात पाऊस सुरू आहे. समुद्रात वादळ सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मासेमारी देखील थांबविण्यात आली आहे.

आंबा, काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. आंबा पीक पालवी, मोहोर आणि काही भागात फळधारणा स्थितीत आहे. आंबा संरक्षणार्थ बागायतदारांनी फवारण्या देखील घेतल्या होत्या. परंतु पावसामुळे ही पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. आंब्याचा मोहोर कुजण्याची शक्यता आहे. ६० टक्केपेक्षा अधिक काजू पिकाला मोहोर आला. त्याचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे काजू बागायतदारांची देखील धास्ती वाढली आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील काहीशी वाढ झाली आहे.

News Item ID: 
820-news_story-1638452101-awsecm-913
Mobile Device Headline: 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार
Appearance Status Tags: 
Section News
Overnight torrential downpour in Sindhudurg districtOvernight torrential downpour in Sindhudurg district
Mobile Body: 

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात बुधवारी (ता.१) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गुरुवारी (ता. २) सकाळपासून देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजूसह सर्वच फळपिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तर काही भागात रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी शक्यता होती. परंतु दिवसभर पाऊस पडला नाही. मात्र रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाने जिल्ह्याला अक्षरक्ष झोडपून काढले. पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या.

शेतमळ्यांमध्ये पाणीच पाणी साचले होते. सर्व तालुक्यात पाऊस सुरू आहे. समुद्रात वादळ सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मासेमारी देखील थांबविण्यात आली आहे.

आंबा, काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. आंबा पीक पालवी, मोहोर आणि काही भागात फळधारणा स्थितीत आहे. आंबा संरक्षणार्थ बागायतदारांनी फवारण्या देखील घेतल्या होत्या. परंतु पावसामुळे ही पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. आंब्याचा मोहोर कुजण्याची शक्यता आहे. ६० टक्केपेक्षा अधिक काजू पिकाला मोहोर आला. त्याचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे काजू बागायतदारांची देखील धास्ती वाढली आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील काहीशी वाढ झाली आहे.

English Headline: 
Agriculture news in marathi Overnight torrential downpour in Sindhudurg district
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
ऊस पाऊस वन forest पाणी water समुद्र
Search Functional Tags: 
ऊस, पाऊस, वन, forest, पाणी, Water, समुद्र
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Overnight torrential downpour in Sindhudurg district
Meta Description: 
Overnight torrential downpour in Sindhudurg district
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात बुधवारी (ता.१) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गुरुवारी (ता. २) सकाळपासून देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment