[ad_1]
सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाच्या संजना सावंत यांची निवड झाली. त्यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा ३० विरुद्ध १९ मतांनी पराभव केला. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे जिल्हा परिषद परिसराला पोलिस छावणीचे रूप प्राप्त झाले होते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली होती. ५० पैकी ३१ सदस्य भाजपचे आहेत. तर १९ सदस्य शिवसेनेचे आहेत. तरी देखील शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे काही सदस्य फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु कुणकूण लागताच भाजप सावध झाला होता.
दरम्यान, भाजपकडून अध्यक्षपदासाठी सावंत यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर शिवसेनेकडून कुडाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शिवसेनेच्या सर्व सदस्यांची भेट आमदार वैभव नाईक यांनी येऊन घेतली. अधिवेशन सोडून खासदार नाराराण राणे यांना जिल्ह्यात यावे लागले. हाच त्यांचा पराभव आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
भूसंपादन उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघन यांनी मतदान प्रक्रियेला सुरवात केली. अधिकाऱ्यांनी हात उंचावून मतदान घेतले. सावंत यांना ३०, तर कुडाळकर यांना १९ मते मिळाली. भाजपचे एक सदस्य गैरहजर राहिले.
जोरदार खडाजंगी
शिवसेनेचे सदस्य संजय पडते यांनी सभागृहाबाहेर भाजप कार्यकर्त्यानी केलेल्या गर्दीला आक्षेप नोंदविला. त्यांनी सर्वांना बाहेर काढण्याची मागणी पोलिसांकडे केली. या वेळी भाजप सदस्यांनी ‘आम्हाला बाहेर काढा असे सांगणारे पडते कोण’ असा प्रतिप्रश्न केला. यावरून दोन गटात जोरदार खडाजंगी झाली. अखेर पोलिसांनी सभागृहाबाहेर असलेल्या सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर या विषयावर पडदा पडला.

[ad_2]
Source link