सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन द्यावे

अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ही बाब एकीकडे उत्साहवर्धक मानता येणारी असतानाच दुसरीकडे सीताफळावर प्रक्रीया करणारे उद्योग तुलनेने नगण्य असल्याचा फटका उत्पादकांना बसत आहे. यंदा आॅक्टोबरच्या सुरुवातीला सातत्याने पावसाळी वातावरण होते. याच काळात सीताफळाची आवक वाढली आणि बाजारपेठेत दर कमी-अधिक होत राहिले. याचा मोठा फटका उत्पादकांना बसला आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सीताफळ प्रक्रीया उद्योगांसाठी प्रोत्साहन तसेच पायाभूत सुविधांची शासनाकडून निर्मिती केली जावी, अशी मागणी सीताफळ उत्पादकांमधून केली जात आहे.

राज्यात सीताफळाची लागवड ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पोचली आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या या फळबागेला जंगली प्राण्यांचा कमी त्रास, इतर फळांच्या तुलनेत व्यवस्थापनावर कमी खर्च व शाश्‍वत उत्पादन या काही कारणांमुळे विदर्भातील शेतकरी ही सीताफळ लागवडीकडे वळाला आहे. त्यामुळे विदर्भात सीताफळाचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत पोचले आहे.

दरवर्षी सीताफळ फळबागांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत या फळाची आवकही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वाढते. यंदा सीताफळ काढणीला आले त्याच काळात पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण होते. अशावेळी फळबागांमधील फळे एकाचवेळी पिकायला सुरुवात झाली. एकीकडे फळ पिकत असताना बाजारात दुर्दैवाने तितका उत्साहवर्धक उठाव नव्हता. काही ठिकाणी कोरोनाच्या कारणाने ग्राहकांनी फळांना पसंती टाळली. यातून मार्ग काढत काही शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत फळे पोचविण्याचा प्रयत्नही केला. परंतु बाजारपेठेत योग्य भाव मात्र मिळाला नसल्याचे उत्पादक सांगत आहेत. पावसामुळे यंदा फळधारणाही कमी झाली होती. त्यामुळेही नुकसान झेलावे लागले.

सीताफळ विक्रीसाठी अकोला व्हावे हब
सीताफळाची अकोला ही एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. येथे विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून विक्रीला येतात. हंगामात दर दिवसाला किमान दीड ते दोन हजार क्रेटपर्यंत आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. शासनाने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

News Item ID: 
820-news_story-1603891811-awsecm-162
Mobile Device Headline: 
सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन द्यावे
Appearance Status Tags: 
Tajya News
Custard apple processing industry should be encouragedCustard apple processing industry should be encouraged
Mobile Body: 

अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ही बाब एकीकडे उत्साहवर्धक मानता येणारी असतानाच दुसरीकडे सीताफळावर प्रक्रीया करणारे उद्योग तुलनेने नगण्य असल्याचा फटका उत्पादकांना बसत आहे. यंदा आॅक्टोबरच्या सुरुवातीला सातत्याने पावसाळी वातावरण होते. याच काळात सीताफळाची आवक वाढली आणि बाजारपेठेत दर कमी-अधिक होत राहिले. याचा मोठा फटका उत्पादकांना बसला आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सीताफळ प्रक्रीया उद्योगांसाठी प्रोत्साहन तसेच   पायाभूत सुविधांची शासनाकडून निर्मिती केली जावी, अशी मागणी सीताफळ उत्पादकांमधून केली जात आहे.

राज्यात सीताफळाची लागवड ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पोचली आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या या फळबागेला जंगली प्राण्यांचा कमी त्रास, इतर फळांच्या तुलनेत व्यवस्थापनावर कमी खर्च व शाश्‍वत उत्पादन या काही कारणांमुळे विदर्भातील शेतकरी ही सीताफळ लागवडीकडे वळाला आहे. त्यामुळे विदर्भात सीताफळाचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत पोचले आहे.

दरवर्षी सीताफळ फळबागांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत या फळाची आवकही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वाढते. यंदा सीताफळ काढणीला आले त्याच काळात पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण होते. अशावेळी फळबागांमधील फळे एकाचवेळी पिकायला सुरुवात झाली. एकीकडे फळ पिकत असताना बाजारात दुर्दैवाने तितका उत्साहवर्धक उठाव नव्हता. काही ठिकाणी कोरोनाच्या कारणाने ग्राहकांनी फळांना पसंती टाळली. यातून मार्ग काढत काही शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत फळे पोचविण्याचा प्रयत्नही केला. परंतु बाजारपेठेत योग्य भाव मात्र मिळाला नसल्याचे उत्पादक सांगत आहेत. पावसामुळे यंदा फळधारणाही कमी झाली होती. त्यामुळेही नुकसान झेलावे लागले.

सीताफळ विक्रीसाठी अकोला व्हावे हब
सीताफळाची अकोला ही एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. येथे विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून विक्रीला येतात. हंगामात दर दिवसाला किमान दीड ते दोन हजार क्रेटपर्यंत आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. शासनाने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Custard apple processing industry should be encouraged
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सीताफळ custard apple पायाभूत सुविधा infrastructure अकोला akola वर्षा varsha फळबाग horticulture विदर्भ vidarbha ऊस कोरोना corona खानदेश मात mate व्यापार
Search Functional Tags: 
सीताफळ, Custard Apple, पायाभूत सुविधा, Infrastructure, अकोला, Akola, वर्षा, Varsha, फळबाग, Horticulture, विदर्भ, Vidarbha, ऊस, कोरोना, Corona, खानदेश, मात, mate, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Custard apple processing industry should be encouraged
Meta Description: 
Custard apple processing industry should be encouraged
सीताफळाची आवक वाढली आणि बाजारपेठेत दर कमी-अधिक होत राहिले. याचा मोठा फटका उत्पादकांना बसला आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सीताफळ प्रक्रीया उद्योगांसाठी प्रोत्साहन तसेच पायाभूत सुविधांची शासनाकडून निर्मिती केली जावी, अशी मागणी सीताफळ उत्पादकांमधून केली जात आहे.Source link

Leave a Comment

X