Take a fresh look at your lifestyle.

सीपीआरः अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी बदली; डॉ. जयप्रकाश रामानंद नवे अधिष्ठाता

0


cpr-kolhapur

कोल्हापूर। राजर्षी शाहू महाराज शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गजभिये यांना जळगावला पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली आहे. मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय का घेण्यात आला याबाबत मात्र सीपीआरच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. डॉ. जयप्रकाश रामानंद हे सध्या धुळे येथील शासकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. ते उद्या शनिवार (२३ मे) रोजी कोल्हापूरचा पदभार स्विकारणार आहेत.

डॉ. मिनाक्षी गजभिये यांची सध्या जळगावच्या शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी बदली करण्यात आलीय. त्याचबरोबर अहमदनगरच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना धुळे येथील शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी पाठवण्यात आले आहे. 

सध्या कोल्हापूरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. सीपीआर रूग्णालय सुरवातीपासूनच यासाठी मोठ्या ताकतीने काम करत आहे. मुंबई, पुणे, आणि इतर जिल्ह्यातून जोपर्यंत लोक येत नव्हते तोपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. परंतु गेल्या आठदिवसात ही परिस्थिती बदलली असून तब्बल २६० रूग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे आणखी ३२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

Previous articleसरकारी खाक्या शेतकऱ्यांच्या मुळावर…

Source link

X