[ad_1]
मालेगाव, जि. वाशीमः येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा जनविकास आघाडीचा एकतर्फी विजय झाला आहे. जनविकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पॅनेलच्या उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला. आमदार अमित झनक काँग्रेस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या समर्थकांचा व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा हा सहकार क्षेत्रातील पराभव झाला आहे.
मालेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे आगामी नगर पंचायतीची रंगीत तालीम म्हणून पहिले जात होते. मागील २५ वर्षांपासून सोसायटीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक बिनविरोध निवडून येत होते. या वेळी आमदार झनक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्यात आली. आमदार झनक यांचे समर्थक व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जगदीश बळी यांचे चिरंजीव राजेश बळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव चोपडे, रामचंद्र बळी, रंजना खवले आदी आमदार झनक समर्थकांनी ही निवडणूक लढविली. याविरुद्ध जनविकास आघाडी व भाजपाने निवडणूक एक दिलाने लढविली. या आघाडीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे जनविकासआघाडीचे सात तर भाजपाच्या सहा उमेदवारांचा समावेश होता. माजी खासदार देशमुख यांचे समर्थक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन देवळे, सय्यद आयुब, रामदास काटेकर, भाजपाचे डॉ. विवेक माने, किशोर महाकाळ आदींनी नियोजनबद्ध प्रचार करून यश मिळवले. त्यांचे सर्व तेराही उमेदवार संचालक झाले आहेत. या निवडणुकीनंतर शहरात व तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव नियोजनाच्या अभावामुळे झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.