सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणा

वाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात गेल्या आठवड्यात हलकी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी सोमवारी (ता.१) झालेल्या व्यवहारात येथे सोयाबीन ५३५१ रुपये दराने कमाल विक्री झाले. येथे आवक सध्या सहा हजार पोत्यांवर पोहोचली आहे.

या हंगामात सुरुवात होण्यापूर्वीच सोयाबीनचे दर दबावात होते. सोयापेंडची आवक केल्याचाही दरांवर मोठा परिणाम झाला. सोयाबीन पाच हजारांच्या आत विक्री व्हायला लागले. खेडा खरेदीत हाच दर ४२०० पर्यंत होता. या आठवड्यात मात्र दरांमध्ये थोडा बदल दिसून येत आहे. २५ ऑक्टोबरला कमाल ४८०० असलेला दर सोमवारी ५३५१ पर्यंत पोहोचला होता. साधारणपणे कमाल दरात पाचशेची सुधारणा झालेली दिसून येते. तर किमान दरसुद्धा ४००० वरून ४४०० झाला. 

गेल्या हंगामातील सोयाबीन या बाजारात उच्चांकी दहा हजारांपर्यंत पोहोचले होते. याशिवाय इतर वेळीसुद्धा वाशीम बाजार समितीत या भागात सर्वाधिक दर मिळाला होता. यामुळे वाशीम बाजार समितीतील दरांकडे शेतकऱ्यांचे विशेष करून लक्ष लागून असते. या बाजार समितीतील आवक दिवाळीच्या तोंडावर सहा हजार क्विंटलपर्यंत पोहोचली होती. परंतु आता दिवाळीमुळे बाजार समिती सोमवार (ता. ८) पर्यंत बंद राहणार आहे. सलग आठवडाभर बाजार बंद असल्याने आता शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल.

वाशीममध्ये सोयाबीनची गेल्या आठवड्यातील आवक (क्विंटल) व दर (रु.)

तारीख किमान कमाल आवक
१ नोव्हेंबर ४४०० ५३५१ ६२७६ 
३० ऑक्टो ४४०० ५२०० ६४६९  
२९ ऑक्टो ४००० ५००५ ४५८५ 
२८ ऑक्टो ४००० ५०५० ४३९५     
२७ ऑक्टो ४००० ५००० ५३४९  
२६ ऑक्टो ४२०० ४८५० ५५५०
२५ ऑक्टो ४००० ४८०० ६१९५

News Item ID: 
820-news_story-1635910967-awsecm-853
Mobile Device Headline: 
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणा
Appearance Status Tags: 
Tajya News
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणासोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणा
Mobile Body: 

वाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात गेल्या आठवड्यात हलकी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी सोमवारी (ता.१) झालेल्या व्यवहारात येथे सोयाबीन ५३५१ रुपये दराने कमाल विक्री झाले. येथे आवक सध्या सहा हजार पोत्यांवर पोहोचली आहे.

या हंगामात सुरुवात होण्यापूर्वीच सोयाबीनचे दर दबावात होते. सोयापेंडची आवक केल्याचाही दरांवर मोठा परिणाम झाला. सोयाबीन पाच हजारांच्या आत विक्री व्हायला लागले. खेडा खरेदीत हाच दर ४२०० पर्यंत होता. या आठवड्यात मात्र दरांमध्ये थोडा बदल दिसून येत आहे. २५ ऑक्टोबरला कमाल ४८०० असलेला दर सोमवारी ५३५१ पर्यंत पोहोचला होता. साधारणपणे कमाल दरात पाचशेची सुधारणा झालेली दिसून येते. तर किमान दरसुद्धा ४००० वरून ४४०० झाला. 

गेल्या हंगामातील सोयाबीन या बाजारात उच्चांकी दहा हजारांपर्यंत पोहोचले होते. याशिवाय इतर वेळीसुद्धा वाशीम बाजार समितीत या भागात सर्वाधिक दर मिळाला होता. यामुळे वाशीम बाजार समितीतील दरांकडे शेतकऱ्यांचे विशेष करून लक्ष लागून असते. या बाजार समितीतील आवक दिवाळीच्या तोंडावर सहा हजार क्विंटलपर्यंत पोहोचली होती. परंतु आता दिवाळीमुळे बाजार समिती सोमवार (ता. ८) पर्यंत बंद राहणार आहे. सलग आठवडाभर बाजार बंद असल्याने आता शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल.

वाशीममध्ये सोयाबीनची गेल्या आठवड्यातील आवक (क्विंटल) व दर (रु.)

तारीख किमान कमाल आवक
१ नोव्हेंबर ४४०० ५३५१ ६२७६ 
३० ऑक्टो ४४०० ५२०० ६४६९  
२९ ऑक्टो ४००० ५००५ ४५८५ 
२८ ऑक्टो ४००० ५०५० ४३९५     
२७ ऑक्टो ४००० ५००० ५३४९  
२६ ऑक्टो ४२०० ४८५० ५५५०
२५ ऑक्टो ४००० ४८०० ६१९५

English Headline: 
agriculture news in marathi Improvement in soybean prices in Washim
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
वाशीम दिवाळी सोयाबीन उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मात mate खेड
Search Functional Tags: 
वाशीम, दिवाळी, सोयाबीन, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मात, mate, खेड
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Improvement in soybean prices in Washim
Meta Description: 
Improvement in soybean prices in Washim
वाशीम : दिवाळीपूर्वी सोमवारी (ता.१) झालेल्या व्यवहारात येथे सोयाबीन ५३५१ रुपये दराने कमाल विक्री झाले. येथे आवक सध्या सहा हजार पोत्यांवर पोहोचली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X