Take a fresh look at your lifestyle.

सोयाबीनच्या दरामध्ये तेजीचा काळ

0

अकोला ः गेले काही दिवस दबावात असलेले सोयाबीनचे दर आता वाढू लागले आहेत. या आठवड्याची सुरुवात वाढीव दराने झाली असून, यात आणखी वाढीची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी (ता.२२) वाशीममध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ६७०० तर अकोट (जि. अकोला) बाजार समितीत ६५०० रुपयांपर्यंत विक्री झाली.

अकोला बाजार समितीत कमाल दर ६७८५ रुपये, तर खामगावमध्ये चांगल्या प्रतीचे सोयाबीन ६४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. प्रामुख्याने बियाणे कंपन्यांकडून खरेदी केली जात असल्याने हे दर वाढल्याची एक शक्यता व्यक्त होत आहे. 

गेले काही दिवस सोयाबीनच्या घसरलेल्या दरांमुळे चिंता निर्माण झाली होती. दिवाळीच्या पर्वात हे दर घसरल्याने खेडा खरेदी अवघी ४५०० रुपयांपर्यंत खाली आली होती. बाजार समित्यांमध्येही ५००० ते ५५०० दरम्यान प्रति क्विंटलला दर मिळत होता. दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री काहीसी रोखून धरली होती. दरम्यान प्लँटधारकांना मोठ्या प्रमाणात सोयाबीन हवी असते. त्या तुलनेत आवक मोठी नसल्याने दरवाढ होऊ लागली आहे. दरात वाढ झाल्याने आता दिवाळीनंतर चांगल्या प्रतीचे सोयाबीन बाजारात येऊ लागले आहे.

त्याचाही परिणाम वाढीव दरांवर दिसू लागला. मात्र, या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, बाजारात ही तेजी एकतर्फी सुरू असल्याने किती दिवस टिकेल, या बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. 

बियाणे कंपन्यांची खरेदी जोरात 
आगामी हंगामासाठी बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विक्री केले जाणारे सोयाबीन कंपन्यांकडून सध्या विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी केले जात आहे. सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये मध्य प्रदेशचा मोठा वाटा आहे. मध्य प्रदेशातील बियाणे कंपन्यांचे खरेदीदार स्थानिक दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील चांगल्या प्रतीचे सोयाबीन सध्या विकत घेत आहेत. यामुळेच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये तेजीचे दिवस सुरू आहेत.

शेतकऱ्यांकडून ६५०० ते ७००० रुपये प्रति क्विंटल दराने घेतलेले सोयाबीन या बियाणे कंपन्या खरीप हंगामात दुप्पट, अडीचपट दराने शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विक्री करतात. हे आता मागील काही हंगामांपासून सर्वश्रुत झाले आहे. 

News Item ID: 
820-news_story-1637592168-awsecm-151
Mobile Device Headline: 
सोयाबीनच्या दरामध्ये तेजीचा काळ
Appearance Status Tags: 
Mukhya News
Period of rise in soybean pricesPeriod of rise in soybean prices
Mobile Body: 

अकोला ः गेले काही दिवस दबावात असलेले सोयाबीनचे दर आता वाढू लागले आहेत. या आठवड्याची सुरुवात वाढीव दराने झाली असून, यात आणखी वाढीची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी (ता.२२) वाशीममध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ६७०० तर अकोट (जि. अकोला) बाजार समितीत ६५०० रुपयांपर्यंत विक्री झाली.

अकोला बाजार समितीत कमाल दर ६७८५ रुपये, तर खामगावमध्ये चांगल्या प्रतीचे सोयाबीन ६४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. प्रामुख्याने बियाणे कंपन्यांकडून खरेदी केली जात असल्याने हे दर वाढल्याची एक शक्यता व्यक्त होत आहे. 

गेले काही दिवस सोयाबीनच्या घसरलेल्या दरांमुळे चिंता निर्माण झाली होती. दिवाळीच्या पर्वात हे दर घसरल्याने खेडा खरेदी अवघी ४५०० रुपयांपर्यंत खाली आली होती. बाजार समित्यांमध्येही ५००० ते ५५०० दरम्यान प्रति क्विंटलला दर मिळत होता. दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री काहीसी रोखून धरली होती. दरम्यान प्लँटधारकांना मोठ्या प्रमाणात सोयाबीन हवी असते. त्या तुलनेत आवक मोठी नसल्याने दरवाढ होऊ लागली आहे. दरात वाढ झाल्याने आता दिवाळीनंतर चांगल्या प्रतीचे सोयाबीन बाजारात येऊ लागले आहे.

त्याचाही परिणाम वाढीव दरांवर दिसू लागला. मात्र, या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, बाजारात ही तेजी एकतर्फी सुरू असल्याने किती दिवस टिकेल, या बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. 

बियाणे कंपन्यांची खरेदी जोरात 
आगामी हंगामासाठी बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विक्री केले जाणारे सोयाबीन कंपन्यांकडून सध्या विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी केले जात आहे. सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये मध्य प्रदेशचा मोठा वाटा आहे. मध्य प्रदेशातील बियाणे कंपन्यांचे खरेदीदार स्थानिक दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील चांगल्या प्रतीचे सोयाबीन सध्या विकत घेत आहेत. यामुळेच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये तेजीचे दिवस सुरू आहेत.

शेतकऱ्यांकडून ६५०० ते ७००० रुपये प्रति क्विंटल दराने घेतलेले सोयाबीन या बियाणे कंपन्या खरीप हंगामात दुप्पट, अडीचपट दराने शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विक्री करतात. हे आता मागील काही हंगामांपासून सर्वश्रुत झाले आहे. 

English Headline: 
Agriculture News in Marathi Period of rise in soybean prices
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोयाबीन अकोला akola उत्पन्न बाजार समिती agriculture market committee अकोट दिवाळी खेड खून आग मध्य प्रदेश madhya pradesh खरीप मात mate
Search Functional Tags: 
सोयाबीन, अकोला, Akola, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, अकोट, दिवाळी, खेड, खून, आग, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, खरीप, मात, mate
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Period of rise in soybean prices
Meta Description: 
Period of rise in soybean prices
गेले काही दिवस दबावात असलेले सोयाबीनचे दर आता वाढू लागले आहेत. या आठवड्याची सुरुवात वाढीव दराने झाली असून, यात आणखी वाढीची शक्यता वर्तवली जात आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X