सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या सुधारित ९७० योजनांना मंजुरी

सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जल जीवन मिशनचा आराखडा सुधारित केला असून, या सुधारित आराखड्याप्रमाणे ९७० योजनांना मंजुरी देऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (ता. १२) दिली. 

पालकमंत्री भरणे यांनी जल जीवन मिशनची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, ‘‘जलजीवन मिशन हे आपल्यासाठी मिशन आहे. त्याच्या मंजुरीनंतर वेळेत ही कामे पूर्ण होतील, यासाठी त्या त्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे,’’ असे सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३८६० शाळा पैकी ६५९९ शाळांना व ४१८० पैकी ४१४६ अंगणवाडी बालवाडी यांना नळजोडणी दिली असून, त्यामुळे शाळा अंगणवाडी व बालवाड्यांना नवीन नळजोडणी देण्याबाबत जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर असल्याचे सांगितले.  जिल्ह्यातील जनजीवन मिशन अंतर्गत ८७४ योजनांचे आराखडे मंजूर आहेत. त्यापैकी ५८ योजनांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून, त्या ५८ योजनांची निविदा प्रक्रिया सुरू आहे व ही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे कार्यकारी अभियंता कोळी यांनी दिली.

News Item ID: 
820-news_story-1636807049-awsecm-189
Mobile Device Headline: 
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या सुधारित ९७० योजनांना मंजुरी
Appearance Status Tags: 
Tajya News
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या सुधारित ९७० योजनांना मंजुरीसोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या सुधारित ९७० योजनांना मंजुरी
Mobile Body: 

सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जल जीवन मिशनचा आराखडा सुधारित केला असून, या सुधारित आराखड्याप्रमाणे ९७० योजनांना मंजुरी देऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (ता. १२) दिली. 

पालकमंत्री भरणे यांनी जल जीवन मिशनची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, ‘‘जलजीवन मिशन हे आपल्यासाठी मिशन आहे. त्याच्या मंजुरीनंतर वेळेत ही कामे पूर्ण होतील, यासाठी त्या त्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे,’’ असे सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३८६० शाळा पैकी ६५९९ शाळांना व ४१८० पैकी ४१४६ अंगणवाडी बालवाडी यांना नळजोडणी दिली असून, त्यामुळे शाळा अंगणवाडी व बालवाड्यांना नवीन नळजोडणी देण्याबाबत जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर असल्याचे सांगितले.  जिल्ह्यातील जनजीवन मिशन अंतर्गत ८७४ योजनांचे आराखडे मंजूर आहेत. त्यापैकी ५८ योजनांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून, त्या ५८ योजनांची निविदा प्रक्रिया सुरू आहे व ही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे कार्यकारी अभियंता कोळी यांनी दिली.

English Headline: 
agriculture news in marathi Solapur Sanction of 970 revised schemes of Jaljivan Mission in the district
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर पूर floods वन forest पाणी water शाळा महाराष्ट्र maharashtra
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, वन, forest, पाणी, Water, शाळा, महाराष्ट्र, Maharashtra
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Solapur: Sanction of 970 revised schemes of Jaljivan Mission in the district
Meta Description: 
Solapur: Sanction of 970 revised schemes of Jaljivan Mission in the district
सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांतील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जल जीवन मिशनचा आराखडा सुधारित केला असून, या सुधारित आराखड्याप्रमाणे ९७० योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X