सोलापूर जिल्ह्यात सौर कृषीपंप योजनेचा ६०० शेतकऱ्यांना लाभ

सोलापूर : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ६०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यापुढेही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत, त्यांना त्याचा लाभ दिला जाईल. तशी तयारी महावितरणने केली आहे, असे  महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढावे, त्यांचा कृषीपंपाच्या खर्चात बचत व्हावी, रात्री-अपरात्री शेतावर जावे लागू नये, दिवसा वीज पुरवठा देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यात ७३७६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. २२०४ शेतकऱ्यांना मंजूरी देऊन त्यांना वीज वितरण कंपनीकडून कोटेशन देण्यात आली आहेत.

या योजनेसाठी महावितरण कंपनीच्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या आठ जागांमध्ये व शासकीय दोन जागांवर एकूण २५८० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातील महावितरण कंपनीच्या उपलब्ध जागेतील ३.०१ मेगावॅट क्षमतेचे चार प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित प्रकल्पाचे कामही सुरू आहे. शासकीय दोन जागांवरील २० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे कामही सुरू असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

वीजजोडणीसाठी १८५ कोटी

जिल्ह्यात कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी १८४.९२ कोटी रूपयांची उच्चदाब वितरण प्रणाली मंजूर आहे. या आराखड्यात ५४१३ वितरण रोहित्रे, १३५०.७४ कि.मी. उच्चदाब वाहिनी आणि ५१६८ वीज जोडणींची कामे पूर्ण झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वीजपुरवठा सुरळीत 

जिल्ह्यातील ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापारेषण कार्यरत आहे. महापारेषण कंपनीचे ३१ अति उच्चदाब उपकेंद्र आहेत. त्यांची स्थापित क्षमता २५५० एमव्हीए (मेगा वोल्ट अँपिअर) आहे. महावितरण कंपनीचे ३३/११  केव्हीएची एकूण 
२६१ उपकेंद्र असून त्यांची स्थापित क्षमता २३५७ एमव्हीए इतकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत सुरु 
आहे. 

News Item ID: 
820-news_story-1597928672-681
Mobile Device Headline: 
सोलापूर जिल्ह्यात सौर कृषीपंप योजनेचा ६०० शेतकऱ्यांना लाभ
Appearance Status Tags: 
Tajya News
Solar Agriculture Pump Scheme benefits 600 farmers in Solapur districtSolar Agriculture Pump Scheme benefits 600 farmers in Solapur district
Mobile Body: 

सोलापूर : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ६०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यापुढेही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत, त्यांना त्याचा लाभ दिला जाईल. तशी तयारी महावितरणने केली आहे, असे  महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढावे, त्यांचा कृषीपंपाच्या खर्चात बचत व्हावी, रात्री-अपरात्री शेतावर जावे लागू नये, दिवसा वीज पुरवठा देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यात ७३७६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. २२०४ शेतकऱ्यांना मंजूरी देऊन त्यांना वीज वितरण कंपनीकडून कोटेशन देण्यात आली आहेत.

या योजनेसाठी महावितरण कंपनीच्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या आठ जागांमध्ये व शासकीय दोन जागांवर एकूण २५८० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातील महावितरण कंपनीच्या उपलब्ध जागेतील ३.०१ मेगावॅट क्षमतेचे चार प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित प्रकल्पाचे कामही सुरू आहे. शासकीय दोन जागांवरील २० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे कामही सुरू असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

वीजजोडणीसाठी १८५ कोटी

जिल्ह्यात कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी १८४.९२ कोटी रूपयांची उच्चदाब वितरण प्रणाली मंजूर आहे. या आराखड्यात ५४१३ वितरण रोहित्रे, १३५०.७४ कि.मी. उच्चदाब वाहिनी आणि ५१६८ वीज जोडणींची कामे पूर्ण झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वीजपुरवठा सुरळीत 

जिल्ह्यातील ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापारेषण कार्यरत आहे. महापारेषण कंपनीचे ३१ अति उच्चदाब उपकेंद्र आहेत. त्यांची स्थापित क्षमता २५५० एमव्हीए (मेगा वोल्ट अँपिअर) आहे. महावितरण कंपनीचे ३३/११  केव्हीएची एकूण 
२६१ उपकेंद्र असून त्यांची स्थापित क्षमता २३५७ एमव्हीए इतकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत सुरु 
आहे. 

English Headline: 
Agriculture news in marathi Solar Agriculture Pump Scheme benefits 600 farmers in Solapur district
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर पूर floods मुख्यमंत्री कृषी agriculture उत्पन्न वीज कंपनी company महावितरण
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, मुख्यमंत्री, कृषी, Agriculture, उत्पन्न, वीज, कंपनी, Company, महावितरण
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Solar Agriculture Pump Scheme benefits 600 farmers in Solapur district
Meta Description: 
Solar Agriculture Pump Scheme benefits 600 farmers in Solapur district
सोलापूर : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ६०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.Source link

Leave a Comment

X