सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर गैरप्रकाराचे आरोप 

 सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांचे चौकशी पथक नियुक्त केले आहे. 

सूर्यकांत व्हनमाने आणि बसवराज माळगे यांनी यासंबंधीची तक्रार दिली आहे. प्रामुख्याने ई-नाम योजनेची अंमलबजावणी, सीसीटीव्ही कॅमेरे, बाजार समितीच्या ठेवी, आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक, सभापतींचे अधिकार उपसभापतींना व सभापती देशमुख यांच्या मालकीच्या जागेबाबत सहकारमंत्री पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सहकारमंत्री पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सभापती यांनी उपसभापती यांना सह्यांचे अधिकार देऊन कायद्यातील तरतुदींचा भंग केला आहे. उपसभापती यांनी केलेल्या बेकायदा कामकाजाची चौकशी करण्यात यावी. कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम मुदतीत जमा करणे आवश्यक असताना भरणा केली नाही, या मुद्याचाही यात समावेश आहे. 

तिघांची चौकशी समिती 
सहकारमंत्र्यांच्या या आदेशानंतर जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके यांच्यासह तीन जणांची चौकशीसाठी नियुक्ती केली आहे. त्यांनीही पाच कर्मचारी मदतीला घेतले आहेत. या तक्रारीनुसार आता चौकशी सुरु होणार असून, बाजार समितीला माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. लवकरच चौकशी करण्यात येईल, असे डोके यांनी सांगितले. 
 
बाजार समितीच्या जागांवर व्यापाऱ्यांची कर्जे 
काही आडत व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या मालकीच्या जमिनीवर कर्ज काढले असून, त्यावर बोजाही नोंद केला आहे, पण त्यासाठी बाजार समितीची परवानगी घेतली नाही. अनेक आडत व्यापारी विनापरवाना व्यवसाय करतात, त्यांच्याकडून सेस वसूल करणे अपेक्षित असताना कोणतीही कारवाई केली जात नाही. तूर, उडीद व मूग या मालाच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे. 

News Item ID: 
820-news_story-1641203117-awsecm-878
Mobile Device Headline: 
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर गैरप्रकाराचे आरोप 
Appearance Status Tags: 
Tajya News
Allegations of malpractice against the Board of Directors of Solapur Market Committee
Mobile Body: 

 सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांचे चौकशी पथक नियुक्त केले आहे. 

सूर्यकांत व्हनमाने आणि बसवराज माळगे यांनी यासंबंधीची तक्रार दिली आहे. प्रामुख्याने ई-नाम योजनेची अंमलबजावणी, सीसीटीव्ही कॅमेरे, बाजार समितीच्या ठेवी, आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक, सभापतींचे अधिकार उपसभापतींना व सभापती देशमुख यांच्या मालकीच्या जागेबाबत सहकारमंत्री पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सहकारमंत्री पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सभापती यांनी उपसभापती यांना सह्यांचे अधिकार देऊन कायद्यातील तरतुदींचा भंग केला आहे. उपसभापती यांनी केलेल्या बेकायदा कामकाजाची चौकशी करण्यात यावी. कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम मुदतीत जमा करणे आवश्यक असताना भरणा केली नाही, या मुद्याचाही यात समावेश आहे. 

तिघांची चौकशी समिती 
सहकारमंत्र्यांच्या या आदेशानंतर जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके यांच्यासह तीन जणांची चौकशीसाठी नियुक्ती केली आहे. त्यांनीही पाच कर्मचारी मदतीला घेतले आहेत. या तक्रारीनुसार आता चौकशी सुरु होणार असून, बाजार समितीला माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. लवकरच चौकशी करण्यात येईल, असे डोके यांनी सांगितले. 
 
बाजार समितीच्या जागांवर व्यापाऱ्यांची कर्जे 
काही आडत व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या मालकीच्या जमिनीवर कर्ज काढले असून, त्यावर बोजाही नोंद केला आहे, पण त्यासाठी बाजार समितीची परवानगी घेतली नाही. अनेक आडत व्यापारी विनापरवाना व्यवसाय करतात, त्यांच्याकडून सेस वसूल करणे अपेक्षित असताना कोणतीही कारवाई केली जात नाही. तूर, उडीद व मूग या मालाच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे. 

English Headline: 
agriclture news in marathi Allegations of malpractice against the Board of Directors of Solapur Market Committee
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर पूर floods उत्पन्न बाजार समिती agriculture market committee बाळ baby infant ई-नाम e-nam मका maize कर्ज व्यापार व्यवसाय profession सेस तूर उडीद मूग
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, बाळ, baby, infant, ई-नाम, e-NAM, मका, Maize, कर्ज, व्यापार, व्यवसाय, Profession, सेस, तूर, उडीद, मूगSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment