Take a fresh look at your lifestyle.

सोशल मिडीयातून चंद्रकांत पाटील यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी

0


chandrkant dada patil

कोल्हापूर। भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही लोकांनी बदनामी करण्याच्या हेतूने कोल्हापूर मध्ये “ जिल्हाधिकारी साहेब गुन्हा दाखल करा – एक कोल्हापूरकर” या आशयाचा मेसेज प्रसिद्ध केला आहे. या मेसेज मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे येथून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घेतली होती का? त्यांची तपासणी कुठे झाली? असे प्रश्न विचारून लोकांच्यामध्ये नाहक शंका निर्माण करण्याचा आणि पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्य सरकार निद्रावस्थेत आहे, अशा परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील राज्याच्या विविध भागात जाऊन आढावा घेत असून रुग्णांची आपुलकीने चौकशी करत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मात्र या चांगल्या गोष्टी चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधकांच्या पचनी न पडल्यामुळे जाणीवपूर्वक दादांची बदनामी करण्याचा असफल प्रयत्न केला जात आहे.

वरील मेसेजचे थोडक्यात स्पष्टीकरण म्हणजे, कायदा व प्रशासनाने दिलेले नियम सामान्य नागरिकांप्रमाणे पाळून योग्य त्या परवानगीनेच दादांनी दौरे केले आहेत त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सोबत जोडली आहेत त्यामुळे आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधकांनी विनाकारण सोशल मीडियातून दादांवर टीका करण्यापेक्षा संकटात सापडलेल्या जनतेची काळजी करावी. तरी अशा खोट्या बातम्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवणा-या लोकांना त्वरीत शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे करण्यात आली आहे.

अशा आशयाचे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांचे वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे ईमेल द्वारे देण्यात आले आहे.

Previous articleकोल्हापूर जिल्ह्यात खते-बियाणे यांचा पुरेसा साठा उपलब्ध; तरीही शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळेना!

Source link

X