[ad_1]
परभणी ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळपासासाठी अन्य जिल्ह्यांतून ऊस आणणे तत्काळ बंद करावे. केवळ कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करावे, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता.१४) दुपारी पूर्णा येथील ताडकळस राज्य रस्त्यावर बळीराजा साखर कारखान्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अतिरिक्त ऊस क्षेत्राची भीती दाखवत कारखान्यांचे कर्मचारी, अधिकारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत. शेअर्सच्या गोंडस नावाने अनामत रक्कमेच्या पावत्या देऊन शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस लागवड नोंद घेतल्या जात नाहीत. कारखान्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ऊस लागवडीच्या नोंदी विना अट घ्याव्यात. प्रतिशेतकरी दिडशे टन ऊस मर्यादेची अट रद्द करावी. अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे, गजानन तुरे, दिगंबर पवार, भास्कर खटींग, मुंजा लोडे,रामप्रसाद गमे, पंडित भोसले, शेख जाफर आदी आंदोलनात सहभागी झाले.

[ad_2]
Source link