‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला सुरुवात : राजू शेट्टी 

बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न, अतिवृष्टिग्रस्तांनी पीकविमा, नुकसानभरपाई आदी प्रश्‍नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र होणार असून, याची सुरुवात गुरुवारी (ता.१७) रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपुरात धरणे आंदोलनाने होत आहे, अशी घोषणा संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, की सोयाबीन पेंडीची आयात थांबवा, पाम तेलावरचा आयात कर पूर्वीसारखा २० टक्के करा, किरकोळ व्यापाऱ्यांवर लादलेली स्टॉक लिमिट उठवा, विमा कंपन्यांनी कराराप्रमाणे सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस जास्त झालेल्या जिल्ह्यात सरसकट मदत द्यावी, कापणीपश्‍चात तारखेचा घोळ न घालता कृषी विभाग सांगते त्या पद्धतीने पीकविम्याचे क्लेम मंजूर करा, राज्याने जाहीर केलेली १० हजारांची नुकसान भरपाईची मदत एकरकमी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. 

याची सुरुवात बुधवारी (ता.१ ७) नागपुरात रविकांत तुपकर संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलनाने करतील. गुरुवारी (ता.१८) प्रत्येक गावात चावडीवर
शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन होईल. शुक्रवारी (ता. १९) संघटनेने रास्ता रोको आंदोलन पुकारले असून, शनिवारी (ता. २०) गावबंद आंदोलन केले जाईल. अशा पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन टप्प्याटप्प्याने वाढत जाईल, असेही या वेळी राजू शेट्टी यांनी जाहीर केले. 

या वेळी श्री. शेट्टी यांनी कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या समस्यांबाबत सविस्तर विवेचन केले. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळणे आवश्‍यक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस पट्ट्यात शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली

News Item ID: 
820-news_story-1636655537-awsecm-678
Mobile Device Headline: 
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला सुरुवात : राजू शेट्टी 
Appearance Status Tags: 
Tajya News
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला सुरुवात : राजू शेट्टी ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला सुरुवात : राजू शेट्टी 
Mobile Body: 

बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न, अतिवृष्टिग्रस्तांनी पीकविमा, नुकसानभरपाई आदी प्रश्‍नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र होणार असून, याची सुरुवात गुरुवारी (ता.१७) रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपुरात धरणे आंदोलनाने होत आहे, अशी घोषणा संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, की सोयाबीन पेंडीची आयात थांबवा, पाम तेलावरचा आयात कर पूर्वीसारखा २० टक्के करा, किरकोळ व्यापाऱ्यांवर लादलेली स्टॉक लिमिट उठवा, विमा कंपन्यांनी कराराप्रमाणे सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस जास्त झालेल्या जिल्ह्यात सरसकट मदत द्यावी, कापणीपश्‍चात तारखेचा घोळ न घालता कृषी विभाग सांगते त्या पद्धतीने पीकविम्याचे क्लेम मंजूर करा, राज्याने जाहीर केलेली १० हजारांची नुकसान भरपाईची मदत एकरकमी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. 

याची सुरुवात बुधवारी (ता.१ ७) नागपुरात रविकांत तुपकर संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलनाने करतील. गुरुवारी (ता.१८) प्रत्येक गावात चावडीवर
शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन होईल. शुक्रवारी (ता. १९) संघटनेने रास्ता रोको आंदोलन पुकारले असून, शनिवारी (ता. २०) गावबंद आंदोलन केले जाईल. अशा पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन टप्प्याटप्प्याने वाढत जाईल, असेही या वेळी राजू शेट्टी यांनी जाहीर केले. 

या वेळी श्री. शेट्टी यांनी कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या समस्यांबाबत सविस्तर विवेचन केले. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळणे आवश्‍यक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस पट्ट्यात शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली

English Headline: 
agriculture news in marathi Swabhimanis agitation will starts from 17th says Raju Shetty
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
रविकांत तुपकर ravikant tupkar आंदोलन agitation खासदार कापूस सोयाबीन ऊस पाऊस कृषी विभाग agriculture department विभाग sections विदर्भ vidarbha शेती farming
Search Functional Tags: 
रविकांत तुपकर, Ravikant Tupkar, आंदोलन, agitation, खासदार, कापूस, सोयाबीन, ऊस, पाऊस, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, विदर्भ, Vidarbha, शेती, farming
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Swabhimanis agitation will starts from 17th says Raju Shetty
Meta Description: 
Swabhimanis agitation will starts from 17th says Raju Shetty
गुरुवारी (ता.१७) रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपुरात धरणे आंदोलनाने होत आहे, अशी घोषणा संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X