स्वास्थ्यवर्धक अन्नपुरवठा व्हावा ः राज्यपाल कोश्‍यारी

अकोला ः एक काळ असा होता, जेव्हा भारत अन्नधान्याची आयात करायचा. आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलो. शास्त्रज्ञांनी संशोधने केली. शेतकऱ्यांनी त्याचा वापर करीत देशाला या बाबतीत स्वयंपूर्ण केले. आता आपल्याला स्वास्थ्यवर्धक अन्न सर्वांना पुरविण्याची, निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षान्त सोहळ्यात ऑनलाइन पद्धतीने अध्यक्षस्थानावरून श्री. कोश्‍यारी बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल, माफसूचे कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, सर्व संचालक, वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाल्यानंतर आता शास्त्रज्ञांनी सर्वांना पोषक, स्वास्थ्यवर्धक अन्न कसे मिळेल याचे पुढील लक्ष ठेवायला हवे. सर्वांच्या प्रयत्नातून देशाने, राज्याने प्रगती केली. हा प्रगतीचा वेग सर्वांना मिळून टिकून ठेवावा लागेल, असेही राज्यपाल म्हणाले. 

डॉ. अग्रवाल म्हणाले, की आज पदवी घेतल्यानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. आजवर घेतलेल्या शिक्षणाचा आपल्या जीवनात अवलंब करा. समाज, शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर करा. तुमच्याकडे आरोग्य, बुद्धिमत्ता आणि शिक्षण असेल तर सर्व काही तुम्ही प्राप्त करू शकता. नव्या शैक्षणिक धोरणात कृषी शिक्षणात काही आमूलाग्र बदल सुचविल्याचे त्यांनी सांगितले. 

स्वागतपर भाषणात कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उपलब्धींची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन, कपाशी व इतर वाणांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होत आहे, हे त्यांनी सांगितले. या सोहळ्यात एकूण ३३५९ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली.

आचार्य पदवी मिळालेले
मीनाक्षी नेवारे (वनस्पती रोगशास्त्र), राहुल जाधव (पशुसंवर्धन व दुग्ध विज्ञान), गोपाल खोरने (कृषी अर्थशास्त्र), पंकज मडावी (कृषी वनस्पतीशास्त्र), रितेश ठाकरे (कृषी जैवतंत्रज्ञान), रंजित लाड (कृषी वनस्पती शास्त्र), सुशिल झोडगे (मृद्‌ विज्ञान कृषी रसायनशास्त्र), राजाभाऊ ईसाळ (कृषी विद्या), गोदावरी साहेबराव गायकवाड (कृषिविद्या), सुमित हिवाळे (कृषी विद्या), स्वाती लोणाग्रे (कृषी कीटकशास्त्र), प्रीती अरविंद सोनकांबळे (कृषी वनस्पतिशास्त्र), वृंदा ठाकरे (कृषी कीटकशास्त्र), अर्चना बोरकर (कृषी कीटकशास्त्र), प्रियांका हिंगणे (पशुसंवर्धन व दुग्धविज्ञान), सुषमा लोखंडे (फुलशेती व प्रांगण सुशोभीकरण आरेखण), संदी बोंदरे (भाजीपाला विज्ञान), आशुतोष पवार (भाजीपाला विज्ञान), स्वप्नील देशमुख (फळविज्ञान), तुळशीदास बस्तेवाड (कृषी यंत्रे आणि शक्ती), जया लोखंडे (सिंचन व निचरा अभियांत्रिकी), तुकेश सुरूपम (कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी), शिल्पा देशमुख (प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी), भाग्यश्री निवृत्ती पाटील (प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी), स्नेहलता चौरे (सिंचन व निचरा अभियांत्रिकी) आणि धीरज कराळे (कृषी यंत्रे व शक्ती) यांना दीक्षान्त सोहळ्यात आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.
Associated Media Ids :  AAK21B08607

News Item ID: 
820-news_story-1635517078-awsecm-248
Mobile Device Headline: 
स्वास्थ्यवर्धक अन्नपुरवठा व्हावा ः राज्यपाल कोश्‍यारी
Appearance Status Tags: 
Mukhya News
There should be healthy food supply: Governor KoshyariThere should be healthy food supply: Governor Koshyari
Mobile Body: 

अकोला ः एक काळ असा होता, जेव्हा भारत अन्नधान्याची आयात करायचा. आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलो. शास्त्रज्ञांनी संशोधने केली. शेतकऱ्यांनी त्याचा वापर करीत देशाला या बाबतीत स्वयंपूर्ण केले. आता आपल्याला स्वास्थ्यवर्धक अन्न सर्वांना पुरविण्याची, निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षान्त सोहळ्यात ऑनलाइन पद्धतीने अध्यक्षस्थानावरून श्री. कोश्‍यारी बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल, माफसूचे कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, सर्व संचालक, वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाल्यानंतर आता शास्त्रज्ञांनी सर्वांना पोषक, स्वास्थ्यवर्धक अन्न कसे मिळेल याचे पुढील लक्ष ठेवायला हवे. सर्वांच्या प्रयत्नातून देशाने, राज्याने प्रगती केली. हा प्रगतीचा वेग सर्वांना मिळून टिकून ठेवावा लागेल, असेही राज्यपाल म्हणाले. 

डॉ. अग्रवाल म्हणाले, की आज पदवी घेतल्यानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. आजवर घेतलेल्या शिक्षणाचा आपल्या जीवनात अवलंब करा. समाज, शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर करा. तुमच्याकडे आरोग्य, बुद्धिमत्ता आणि शिक्षण असेल तर सर्व काही तुम्ही प्राप्त करू शकता. नव्या शैक्षणिक धोरणात कृषी शिक्षणात काही आमूलाग्र बदल सुचविल्याचे त्यांनी सांगितले. 

स्वागतपर भाषणात कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उपलब्धींची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन, कपाशी व इतर वाणांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होत आहे, हे त्यांनी सांगितले. या सोहळ्यात एकूण ३३५९ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली.

आचार्य पदवी मिळालेले
मीनाक्षी नेवारे (वनस्पती रोगशास्त्र), राहुल जाधव (पशुसंवर्धन व दुग्ध विज्ञान), गोपाल खोरने (कृषी अर्थशास्त्र), पंकज मडावी (कृषी वनस्पतीशास्त्र), रितेश ठाकरे (कृषी जैवतंत्रज्ञान), रंजित लाड (कृषी वनस्पती शास्त्र), सुशिल झोडगे (मृद्‌ विज्ञान कृषी रसायनशास्त्र), राजाभाऊ ईसाळ (कृषी विद्या), गोदावरी साहेबराव गायकवाड (कृषिविद्या), सुमित हिवाळे (कृषी विद्या), स्वाती लोणाग्रे (कृषी कीटकशास्त्र), प्रीती अरविंद सोनकांबळे (कृषी वनस्पतिशास्त्र), वृंदा ठाकरे (कृषी कीटकशास्त्र), अर्चना बोरकर (कृषी कीटकशास्त्र), प्रियांका हिंगणे (पशुसंवर्धन व दुग्धविज्ञान), सुषमा लोखंडे (फुलशेती व प्रांगण सुशोभीकरण आरेखण), संदी बोंदरे (भाजीपाला विज्ञान), आशुतोष पवार (भाजीपाला विज्ञान), स्वप्नील देशमुख (फळविज्ञान), तुळशीदास बस्तेवाड (कृषी यंत्रे आणि शक्ती), जया लोखंडे (सिंचन व निचरा अभियांत्रिकी), तुकेश सुरूपम (कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी), शिल्पा देशमुख (प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी), भाग्यश्री निवृत्ती पाटील (प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी), स्नेहलता चौरे (सिंचन व निचरा अभियांत्रिकी) आणि धीरज कराळे (कृषी यंत्रे व शक्ती) यांना दीक्षान्त सोहळ्यात आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.
Associated Media Ids :  AAK21B08607

English Headline: 
Agriculture news in Marathi There should be healthy food supply: Governor Koshyari
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
भारत कृषी विद्यापीठ agriculture university दादा भुसे dada bhuse कृषी शिक्षण education आरोग्य health सोयाबीन अर्थशास्त्र economics जैवतंत्रज्ञान biotechnology स्वप्न सिंचन media
Search Functional Tags: 
भारत, कृषी विद्यापीठ, Agriculture University, दादा भुसे, Dada Bhuse, कृषी शिक्षण, Education, आरोग्य, Health, सोयाबीन, अर्थशास्त्र, Economics, जैवतंत्रज्ञान, Biotechnology, स्वप्न, सिंचन, media
Twitter Publish: 
Meta Keyword: 
There should be healthy food supply: Governor Koshyari
Meta Description: 
There should be healthy food supply: Governor Koshyari
आपल्याला स्वास्थ्यवर्धक अन्न सर्वांना पुरविण्याची, निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्त केले.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X