Take a fresh look at your lifestyle.

हळदीमध्ये आंतरमशागतीचे महत्त्व

0

तापमान कमी-जास्त झाले तर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. याचा गड्ड्यांची संख्या आणि आकारावर परिणाम होतो. त्यामुळे या काळात हळद पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

निर्यातक्षम आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून काढणीपर्यंत हळद पिकाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सध्या हळद लागवड होऊन पाच महिन्यांच्या कालावधी (१५० दिवस) पूर्ण झाला आहे. या काळात पिकाच्या उगवण आणि शाकीय वाढ अशा दोन अवस्था पूर्ण झालेल्या असतात. त्यापुढील काळात (१५० ते २१० दिवसांत) हळकुंड फुटण्यास सुरुवात होते. हा काळ नवीन आलेल्या फुटव्यांपासून हळकुंड फुटण्याचा असतो. या काळात तापमानात घट होत असते. साधारण २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान हळकुंडे फुटण्यास सुरुवात होते.

पिकाच्या योग्य वाढीसाठी सद्यःस्थितीत आंतरमशागतीची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये खत, पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण, फुलांचे दांडे न काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो. तापमान कमी-जास्त झाले तर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. याचा गड्ड्यांची संख्या आणि आकारावर परिणाम होतो. त्यामुळे या काळात हळद पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

आंतरमशागत (भरणी करणे) 

 • भरणी म्हणजे सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यांमधील मोकळ्या जागेतील माती दीड ते २ इंचपर्यंत शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्ड्यांना लावावी.
 • लागवडीनंतर अडीच ते ३ महिन्यांनी पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करावी लागते.
 • भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात. त्यांची वाढ चांगली होते. तसेच उत्पादनात साधारण १० ते १५ टक्क्याने वाढ दिसून येते.
 • गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा २ गादीवाफ्यांमधील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रीपर मातीखाली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • भरणी केली नसेल तर फुटव्यांपासून नव्याने आलेली हळकुंडे उघडी पडतात. सू्र्यप्रकाशात हळकुंडे आल्यास ती हिरवी पडतात आणि वाढ खुंटते. तसेच उघड्या राहिलेल्या हळकुंडांवर किंवा गड्ड्यावर कंदमाशीसारख्या किडी अंडी घालतात. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रसार होतो. त्यामुळे भरणी यंत्राच्या किंवा मजुरांच्या साह्याने तत्काळ मातीची भर लावून हळकुंडे पूर्णपणे झाकून घ्यावीत. त्यामुळे हळकुंडांचे चांगली पोसली जातात.

खत व्यवस्थापन 

 •  हळद पिकांस हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी आणि नत्र दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी आणि दुसरा भरणीच्या वेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) द्यावा.
 • भरणीच्या वेळी हेक्टरी २१५ किलो युरिया, २५ किलो फेरस सल्फेट (हिराकस) आणि २ टन निंबोळी किंवा करंज पेंडीचा वापर करावा.
 • भरणी करताना खते दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीत मिसळली जातात. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये जवळ जवळ १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते.
 • शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर पिकांस कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत देऊ नये. नत्रयुक्त खतांमुळे अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी, पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन लांबणीवर पडते.
 • पोटॅशयुक्त खतांची कमतरता असलेल्या ठिकाणी हेक्टरी १२५ किलो पांढरे पोटॅश द्यावे. त्यामुळे हळकुंडांचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.

पाणी व्यवस्थापन 

 • रुंद वरंबा पद्धतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. ठिबकच्या दोन लॅटरलमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. दोन तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे. रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा.
 • ठिबक सिंचनामुळे जमिनीत वाफसा लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होतो, सूक्ष्मजीवांच्या क्रिया सुधारते, मातीची सच्छिद्रता वाढते, जलधारणक्षमता वाढण्यास मदत होते. परिणामी, मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे वहन सुलभ होऊन शोषण अधिक होते. सूक्ष्म पाने लवकर मोठी होतात. तसेच कुरकुमीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
 • जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन ठिबक संच चालू ठेवावा. जमिनीत सतत ओलावा राहिल्यास हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.
 • हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. हलक्या ते मध्यम जमिनीत १३ ते १५ पाळ्या द्याव्यात.
 • शिफारशीत मात्रेपेक्षा कमी पाणी दिले तर कंदाची योग्य वाढ होत नाही. प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते.
 • लागवडीपासून साधारण ८ महिन्यांपर्यंत जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी देत राहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते.

तणनियंत्रण 

 • तणवर्गीय वनस्पती विविध रोग-किडींसाठी यजमान म्हणून कार्य करतात. त्यामुळे पिकावर रोग-किडींचा प्रादुर्भाव लवकर होतो. त्यासाठी वेळीच तण नियंत्रण करणे गरजेचे असते.
 • लागवडीपासून ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने निंदणी करावी.
 • हळद उगवणीनंतर तणनाशकांचा वापर टाळावा. तणनाशकांचा वापर केल्यामुळे पिकाच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो.

आंतरपिकांची लागवड 

 • हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकांची मुळे जमिनीत समान खोलीवर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
 • लागवडीपासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसण्यास सुरुवात होते. हळकुंडे येण्यापूर्वी आंतरपिकाची काढणी फायदेशीर ठरते.
 • आंतरपिकांसाठी श्रावण घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, तूर, उडीद, मूग, मटकी या पिकांची निवड करावी. मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये.

फुलांचे दांडे न काढणे 

 • शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळदीला फुले येण्यास सुरुवात होते. काही जातींना जास्त तर काहींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात. हळदीला फुले येणे म्हणजेच हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी पूर्ण होऊन कंद सुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण आहे.
 • फुलांचे दांडे झाडावर तसेच ठेवले तरी हळद पिकावर कोणताही परिणाम होत नाही. फुलांचे दांडे काढणे ही खर्चिक प्रक्रिया आहे. तसेच या दांड्यांमुळे उत्पादनात घट येत नाही. काही कारणास्तव एकदा दांडे काढले तरी ते नव्याने येत राहतात. फुले काढताना हळद पिकाच्या खोडाला इजा झाली, तर त्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होऊन कंदकुज रोग होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे हळदीला आलेली फुले तशीच राहू द्यावीत.

-डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
(प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)

News Item ID: 
820-news_story-1636632394-awsecm-436
Mobile Device Headline: 
हळदीमध्ये आंतरमशागतीचे महत्त्व
Appearance Status Tags: 
Section News
Vigorous growth of turmeric due to drip irrigation.Vigorous growth of turmeric due to drip irrigation.
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Importance of interculture operation in turmeric
Author Type: 
External Author
डॉ. मनोज माळी
हळद हळद लागवड turmeric cultivation खत fertiliser तण weed यंत्र machine ठिबक सिंचन सिंचन रासायनिक खत chemical fertiliser ओला झेंडू तूर उडीद मूग
Search Functional Tags: 
हळद, हळद लागवड, Turmeric Cultivation, खत, Fertiliser, तण, weed, यंत्र, Machine, ठिबक सिंचन, सिंचन, रासायनिक खत, Chemical Fertiliser, ओला, झेंडू, तूर, उडीद, मूग
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Importance of interculture operation in turmeric
Meta Description: 
Importance of interculture operation in turmeric
तापमान कमी-जास्त झाले तर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. याचा गड्ड्यांची संख्या आणि आकारावर परिणाम होतो. त्यामुळे या काळात हळद पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X