Take a fresh look at your lifestyle.

हळद सल्ला: हळदीचे वाण व काढणीसंबंधीचा कृषी सल्ला – आम्ही कास्तकार

0
हळद सल्ला: हळदीचे वाण व काढणीसंबंधी

हळद सल्ला: हळदीचे वाण व काढणीसंबंधी

महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात लागवड एप्रिल मे महिन्यात होत असल्याने हळदीची काढणी सुरु करावयास हरकत नाही तर जून जुलै मध्ये लागवड केलेल्या विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील हळदीची काढणी फेब्रुवारी मार्च महिन्यात करावी.

• हळदीची काढणी जातींच्या प्रकारानुसार केली जाते. हळदीच्या एकूण तीन प्रकारच्या जाती आहेत. यामध्ये हळव्या (६ ते ७ महिन्यात तयार होणाऱ्या), निमगरव्या (८ ते ८.५ महिन्यात तयार होणाऱ्या) आणि गरव्या (९ महिन्यात तयार होणाऱ्या) जातींचा समावेश होतो. 
• हळव्या जातीमध्ये आंबे हळद, काळी हळद तर निमगरव्या जातीमध्ये फुले स्वरूपा, वायगाव आणि गरव्या जातीमध्ये सेलम, कृष्णा, कडाप्पा या जातींचा समावेश होतो. 
• हळद वाढीच्या चार टप्प्यांपैकी सध्या हळदीची वाढ शेवटच्या टप्प्यामध्ये असून या अवस्थेमध्ये पानातील अन्न कंदामध्ये उतरते त्यामुळे पाने शेंड्याकडून सुकायला लागतात. हळदीच्या कंदामधील पाण्याचा अंश कमी होऊन कंदाचे वजन प्रामुख्याने या अवस्थेमध्ये वाढते.

-डॉ. जितेंद्र कदम, काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, रोहा.
X