हापूस आंबा जाणार दोन वर्षांनंतर अमेरिकेत

रत्नागिरी ः कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे गेली दोन वर्षे अमेरिकेला होणाऱ्या आंब्याच्या निर्यातीत अडथळे आले होते; मात्र केंद्र सरकारने यंदा तो दूर केला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाकडून यंदाच्या हंगामात भारतीय आंब्यांना निर्यातीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे अमेरिकन ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीच्या हापूसची चव दोन वर्षांनी चाखायला मिळणार आहे. देशभरातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या विविध आंब्याच्या तुलनेत हापूसचा टक्का सर्वाधिक असतो.

अमेरिकेच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या निर्यात मंजुरीमुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश,  आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा या भागातील उत्पादित आंब्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे भारताच्या उत्तर तसेच पूर्व भागातील उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्‍चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या लंगडा, दशहरी, फझली आदी आंब्यांसह कोकणातील हापूसची चव अमेरिकन ग्राहकांना चाखावयास मिळणार आहे.

देशभरातून अमेरिकेला १ हजार टन आंबा निर्यात होतो. त्यामध्ये तीनशे टन हापूस आहे. अमेरिकेत सर्वाधिक हापूसला मागणी आहे. कोरोनामुळे थांबलेली निर्यात पुन्हा एकदा सुरू होणार आहे. तसेच २०२२ मधील आंबा निर्यात २०१९-२० पेक्षा अधिक असेल असा अंदाज निर्यातदारांनी वर्तविला आहे.

कोविड महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, अमेरिकेच्या कृषी विभागातील निरीक्षकांना आंब्यांवरील विकिरण सुविधेची तपासणी करण्यासाठी भारतात येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे २०२० पासून भारतीय आंब्यांच्या अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते.

२३ नोव्हेंबर २०२१ रोजी १२ वी भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाची बैठक झाली. त्यातील निर्णयांना अनुसरून भारताचे कृषी मंत्रालय आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्या दरम्यान परस्परांच्या कृषी बाजारांमध्ये मालाला प्रवेश देण्याचा करारावर झाला. या करारानुसार, भारतीय आंबे तसेच डाळिंबे यांची अमेरिकेला निर्यात होणार असून, अमेरिकेची चेरी आणि अल्फाल्फा ही पिके भारतात आयात होणार आहेत. यासाठी विकिरण प्रक्रिया अत्यावश्यक करण्यात आली आहे.
 
प्रतिक्रिया

कोरोनामुळे गेली दोन वर्षे अमेरिकेतील निर्यात थांबलेली होती. त्यामुळे आंबा बागायतदारांचे एक परदेशी मार्केट बंद होते. यंदा ते खुले झाल्यामुळे शेतकऱ्याला निश्‍चितच फायदा होणार असून दरही चांगला मिळेल.
– डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार

News Item ID: 
820-news_story-1642167674-awsecm-858
Mobile Device Headline: 
हापूस आंबा जाणार दोन वर्षांनंतर अमेरिकेत
Appearance Status Tags: 
Mukhya News
Hapus will go mango In the United States two years later
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi Hapus will go mango In the United States two years later
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कोरोना corona कृषी विभाग agriculture department विभाग sections मात mate भारत हापूस वर्षा varsha महाराष्ट्र maharashtra उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश बिहार पश्‍चिम बंगाल कोकण konkan अमेरिका व्यापार मंत्रालय डाळ
Search Functional Tags: 
कोरोना, Corona, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, मात, mate, भारत, हापूस, वर्षा, Varsha, महाराष्ट्र, Maharashtra, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, कोकण, Konkan, अमेरिका, व्यापार, मंत्रालय, डाळ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Hapus will go mango In the United States two years later
Meta Description: 
Hapus will go mango
In the United States two years later
कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे गेली दोन वर्षे अमेरिकेला होणाऱ्या आंब्याच्या निर्यातीत अडथळे आले होते; मात्र केंद्र सरकारने यंदा तो दूर केला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment