हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा 

मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू नका, समोरासमोर या. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलो, तरी पोलिसांच्या मागे लपून कारवाया करत नाही. माझी ताकद शिवसैनिक आहे. त्यांच्या हिंमतीवरच मी तुमच्यासोबत लढेन. तुम्ही चिरकत राहा, पण माझा वाडा चिरेबंदी आहे,’’ असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. 

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोजक्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री अनिल परब आदींसह आमदार, नगरसेवक, महापौर, विभागप्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. आपल्या कामांची चित्रफीत दाखवत शिवसेनेने मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची अनौपचारिक सुरुवात केली. 

भाजपचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ‘‘कोणाच्या कुटुंबावर, पत्नीवर आणि मुलांवर वैयक्तिक आरोप करणे, कोणाच्या तरी आडून लपून हल्ले करणे आणि तो मी नव्हेच, असे सांगणे हे हिंदुत्व नसून, नामर्दपणा अन् षंढत्व आहे. देशातील बंदरांच्या सीएसआरमधील ७५ टक्के निधी मोदी सरकारने गुजरातकडे वळवला आहे. आज उपटसुंभ नव हिंदूंपासून हिंदुत्व धोक्यात आहे. कारण हिंदुत्वाची शिडी करून वर चढलेले आता इंग्रजांची फोडा व झोडा नीती वापरत आहेत. त्यामुळे जात-पात-धर्म विसरून मराठी माणसाची एकजूट बांधा. मराठी-अमराठी हा भेदभाव गाडून हिंदूंची एकजूट बांधा.’’ 

राज्याची बदनामी का? 
देशात जणू काही फक्त महाराष्ट्रातच गांजा-चरस यांचा वापर होतो, असे चित्र उभे केले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांनी एक सेलिब्रिटी पकडला तर ढोल वाजवले जातात. मात्र, मुंबई पोलिस त्याहीपेक्षा मोठी कामगिरी करतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष होते. राज्यात अमली पदार्थ आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या छाप्यांबाबतही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, ‘सत्तेचे व्यसन अमली पदार्थ आहे. छापा टाकून काटा काढायचा, हे प्रकार जास्त दिवस चालू शकणार नाहीत. भाजपसोबत असले की गंगा, नाही तर गटारगंगा हा सुरू असलेला प्रकार जनतेलाही आता लक्षात येऊ लागला आहे.’ कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप हे हिंदुत्व नाही, तर षंढपणा असल्याची चीडही ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईत गेल्या महिन्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा उल्लेखही ठाकरे यांनी केला. या प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरच फासावर लटकवले जाईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

मत्सरातून राज्याच्या संस्कृतीवर हल्ले 
हर्षवर्धन पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सत्तापिपासूपणावरही टीका केली. त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवले असले, तर कदाचित मी राजकारणातूनही बाजूला झालो असतो. मी वचन पाळण्यासाठी मुख्यमंत्री झालो. मै फकीर हू… झोली फैला के बैठा हू, असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, असे आव्हानही त्यांनी दिले. महाराष्ट्राची आगेकूच पाहून काहींच्या पोटात दुखत असल्याने महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी आपल्या संस्कृतीवर हल्ले होत आहेत. सत्ता घ्या हवीतर, पण आमच्यासारखे काम करून दाखवा, असेही ठाकरे यांनी बजावले.  

News Item ID: 
820-news_story-1634394345-awsecm-736
Mobile Device Headline: 
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा 
Appearance Status Tags: 
Section News
हे हिंदुत्व नाही - उद्धव ठाकरे This is not Hindutva - Uddhav Thackerayहे हिंदुत्व नाही - उद्धव ठाकरे This is not Hindutva - Uddhav Thackeray
Mobile Body: 

मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू नका, समोरासमोर या. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलो, तरी पोलिसांच्या मागे लपून कारवाया करत नाही. माझी ताकद शिवसैनिक आहे. त्यांच्या हिंमतीवरच मी तुमच्यासोबत लढेन. तुम्ही चिरकत राहा, पण माझा वाडा चिरेबंदी आहे,’’ असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. 

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोजक्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री अनिल परब आदींसह आमदार, नगरसेवक, महापौर, विभागप्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. आपल्या कामांची चित्रफीत दाखवत शिवसेनेने मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची अनौपचारिक सुरुवात केली. 

भाजपचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ‘‘कोणाच्या कुटुंबावर, पत्नीवर आणि मुलांवर वैयक्तिक आरोप करणे, कोणाच्या तरी आडून लपून हल्ले करणे आणि तो मी नव्हेच, असे सांगणे हे हिंदुत्व नसून, नामर्दपणा अन् षंढत्व आहे. देशातील बंदरांच्या सीएसआरमधील ७५ टक्के निधी मोदी सरकारने गुजरातकडे वळवला आहे. आज उपटसुंभ नव हिंदूंपासून हिंदुत्व धोक्यात आहे. कारण हिंदुत्वाची शिडी करून वर चढलेले आता इंग्रजांची फोडा व झोडा नीती वापरत आहेत. त्यामुळे जात-पात-धर्म विसरून मराठी माणसाची एकजूट बांधा. मराठी-अमराठी हा भेदभाव गाडून हिंदूंची एकजूट बांधा.’’ 

राज्याची बदनामी का? 
देशात जणू काही फक्त महाराष्ट्रातच गांजा-चरस यांचा वापर होतो, असे चित्र उभे केले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांनी एक सेलिब्रिटी पकडला तर ढोल वाजवले जातात. मात्र, मुंबई पोलिस त्याहीपेक्षा मोठी कामगिरी करतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष होते. राज्यात अमली पदार्थ आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या छाप्यांबाबतही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, ‘सत्तेचे व्यसन अमली पदार्थ आहे. छापा टाकून काटा काढायचा, हे प्रकार जास्त दिवस चालू शकणार नाहीत. भाजपसोबत असले की गंगा, नाही तर गटारगंगा हा सुरू असलेला प्रकार जनतेलाही आता लक्षात येऊ लागला आहे.’ कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप हे हिंदुत्व नाही, तर षंढपणा असल्याची चीडही ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईत गेल्या महिन्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा उल्लेखही ठाकरे यांनी केला. या प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरच फासावर लटकवले जाईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

मत्सरातून राज्याच्या संस्कृतीवर हल्ले 
हर्षवर्धन पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सत्तापिपासूपणावरही टीका केली. त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवले असले, तर कदाचित मी राजकारणातूनही बाजूला झालो असतो. मी वचन पाळण्यासाठी मुख्यमंत्री झालो. मै फकीर हू… झोली फैला के बैठा हू, असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, असे आव्हानही त्यांनी दिले. महाराष्ट्राची आगेकूच पाहून काहींच्या पोटात दुखत असल्याने महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी आपल्या संस्कृतीवर हल्ले होत आहेत. सत्ता घ्या हवीतर, पण आमच्यासारखे काम करून दाखवा, असेही ठाकरे यांनी बजावले.  

English Headline: 
Agriculture News in Marathi This is not Hindutva – Uddhav Thackeray
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare मुंबई mumbai महाराष्ट्र maharashtra रश्मी ठाकरे rashmi thackeray पर्यावरण environment आदित्य ठाकरे aditya thakare खासदार संजय राऊत sanjay raut अनिल देसाई एकनाथ शिंदे eknath shinde विधान परिषद अनिल परब anil parab महापालिका पत्नी wife सरकार government पोलिस व्यसन बलात्कार गुन्हेगार हर्षवर्धन पाटील harshwardhan patil देवेंद्र फडणवीस devendra fadnavis राजकारण politics
Search Functional Tags: 
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुंबई, Mumbai, महाराष्ट्र, Maharashtra, रश्मी ठाकरे, Rashmi Thackeray, पर्यावरण, Environment, आदित्य ठाकरे, Aditya Thakare, खासदार, संजय राऊत, Sanjay Raut, अनिल देसाई, एकनाथ शिंदे, Eknath Shinde, विधान परिषद, अनिल परब, Anil Parab, महापालिका, पत्नी, wife, सरकार, Government, पोलिस, व्यसन, बलात्कार, गुन्हेगार, हर्षवर्धन पाटील, Harshwardhan Patil, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, राजकारण, Politics
Twitter Publish: 
Meta Keyword: 
This is not Hindutva – Uddhav Thackeray
Meta Description: 
This is not Hindutva – Uddhav Thackeray
माझी ताकद शिवसैनिक आहे. त्यांच्या हिंमतीवरच मी तुमच्यासोबत लढेन. तुम्ही चिरकत राहा, पण माझा वाडा चिरेबंदी आहे,’’ असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X