२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या…

नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा संपूर्ण जगाला बसला. त्यात लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसायांना आर्थिक फटका बसला. या नुकसानातून अनेकांनी स्वत:ला सावरले; पण अनेकांनी आयुष्य संपविले. यात छोटे आणि मध्यम व्यापारी आहेत. आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, २०२० मध्ये १७ हजार ३३२ व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवाळखोरी आणि कर्जाचा बोजा अशी या आत्महत्यांमागील कारणे आहेत.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग म्हणजेच ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’ने (एनसीआरबी) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात स्वयंरोजगार या श्रेणीत व्यापाऱ्यांच्या आत्महत्या नोंदविण्यात आल्या आहेत. या आकडेवारीनुसार २०२० मध्ये १७ हजार ३३२ स्वयंरोजगार करणाऱ्या अर्थात व्यावसायिकांनी आत्महत्या केली. याच वर्षांत १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या कली आहे. कोरोनाने केवळ आरोग्य व्यवस्थेला झटका दिला नाही, तर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातील अनेकांना दुकाने बंद करावी लागली आहेत, तर अनेकांनी व्यवसाय बदलून आर्थिक विवंचनेतून मार्गही काढला आहे.

देशातील एकूण आत्महत्यांचा आकडा सुमारे १० टक्क्यांनी वाढून १ लाख ५३ हजारांवर पोहोचला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. साधारणपणे शेतकऱ्यांच्या तुलनेत व्यापारी समुदायामध्ये आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नेहमीच कमी होते. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे व्यापारी वर्ग तणावाखाली आहेत. यातील असह्य ताणामुळे अनेकांनी मृत्यूला कवटाळले. एकूण आत्महत्यांच्या संख्येत स्वयंरोजगार करणाऱ्या व्यावसायिकांच्या आत्महत्येचे प्रमाण ११.३ टक्के आहे. या विभागाने व्यावसायिकांच्या मृत्यूची नोंद ही विक्रेता (व्हेंडर), व्यापारी (ट्रेड्समन), इतर व्यवसाय आणि इतर स्वयंरोजगार या प्रकारात घेतली आहे.

या अहवालानुसार, सर्वाधिक आत्महत्या (१९९०९) या महाराष्ट्रात करण्यात आल्या. त्या पाठोपाठ तमिळनाडू (१६८८३), मध्य प्रदेश (१४५७८), पश्‍चिम बंगाल (१३१०३) आणि कर्नाटक (१२२५९) आहे. या पाच राज्यांतील आत्महत्यांचे प्रमाण हे एकूण आत्महत्येच्या ५०.१ टक्के आहे. उर्वरित ४९.९ टक्के आत्महत्या या देशातील २३ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये

झाल्या आहेत. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या उत्तर प्रदेशातील आत्महत्यांचे प्रमाण केवळ ३.१ टक्के आहे.
आत्महत्यांचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)

 • रोजंदारी करणारे : २४.६
 • गृहिणी : १४.६
 • स्वयंरोजगार करणारे : ११.३
 • बेरोजगार : १०.२
 • नोकरदार : ९.७
 • विद्यार्थी : ८.२
 • शेतकरी / शेतमजूर : ७
 • सेवानिवृत्त व्यक्ती : १
 • इतर व्यक्ती १३.४

व्यावसायिकांच्या आत्महत्या

 • विक्रेता : ४२२६
 • व्यापारी : ४३५६
 • इतर व्यावसायिक : ३१३४
 • इतर स्वयंरोजगार करणारे : ५६१६
 • एकूण : १७३३२

रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्ती : ३७६६६
शेतकरी / शेतमजूर : १०६७७ 

News Item ID: 
820-news_story-1636395870-awsecm-535
Mobile Device Headline: 
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या…
Appearance Status Tags: 
Tajya News
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या...२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या...
Mobile Body: 

नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा संपूर्ण जगाला बसला. त्यात लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसायांना आर्थिक फटका बसला. या नुकसानातून अनेकांनी स्वत:ला सावरले; पण अनेकांनी आयुष्य संपविले. यात छोटे आणि मध्यम व्यापारी आहेत. आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, २०२० मध्ये १७ हजार ३३२ व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवाळखोरी आणि कर्जाचा बोजा अशी या आत्महत्यांमागील कारणे आहेत.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग म्हणजेच ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’ने (एनसीआरबी) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात स्वयंरोजगार या श्रेणीत व्यापाऱ्यांच्या आत्महत्या नोंदविण्यात आल्या आहेत. या आकडेवारीनुसार २०२० मध्ये १७ हजार ३३२ स्वयंरोजगार करणाऱ्या अर्थात व्यावसायिकांनी आत्महत्या केली. याच वर्षांत १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या कली आहे. कोरोनाने केवळ आरोग्य व्यवस्थेला झटका दिला नाही, तर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातील अनेकांना दुकाने बंद करावी लागली आहेत, तर अनेकांनी व्यवसाय बदलून आर्थिक विवंचनेतून मार्गही काढला आहे.

देशातील एकूण आत्महत्यांचा आकडा सुमारे १० टक्क्यांनी वाढून १ लाख ५३ हजारांवर पोहोचला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. साधारणपणे शेतकऱ्यांच्या तुलनेत व्यापारी समुदायामध्ये आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नेहमीच कमी होते. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे व्यापारी वर्ग तणावाखाली आहेत. यातील असह्य ताणामुळे अनेकांनी मृत्यूला कवटाळले. एकूण आत्महत्यांच्या संख्येत स्वयंरोजगार करणाऱ्या व्यावसायिकांच्या आत्महत्येचे प्रमाण ११.३ टक्के आहे. या विभागाने व्यावसायिकांच्या मृत्यूची नोंद ही विक्रेता (व्हेंडर), व्यापारी (ट्रेड्समन), इतर व्यवसाय आणि इतर स्वयंरोजगार या प्रकारात घेतली आहे.

या अहवालानुसार, सर्वाधिक आत्महत्या (१९९०९) या महाराष्ट्रात करण्यात आल्या. त्या पाठोपाठ तमिळनाडू (१६८८३), मध्य प्रदेश (१४५७८), पश्‍चिम बंगाल (१३१०३) आणि कर्नाटक (१२२५९) आहे. या पाच राज्यांतील आत्महत्यांचे प्रमाण हे एकूण आत्महत्येच्या ५०.१ टक्के आहे. उर्वरित ४९.९ टक्के आत्महत्या या देशातील २३ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये

झाल्या आहेत. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या उत्तर प्रदेशातील आत्महत्यांचे प्रमाण केवळ ३.१ टक्के आहे.
आत्महत्यांचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)

 • रोजंदारी करणारे : २४.६
 • गृहिणी : १४.६
 • स्वयंरोजगार करणारे : ११.३
 • बेरोजगार : १०.२
 • नोकरदार : ९.७
 • विद्यार्थी : ८.२
 • शेतकरी / शेतमजूर : ७
 • सेवानिवृत्त व्यक्ती : १
 • इतर व्यक्ती १३.४

व्यावसायिकांच्या आत्महत्या

 • विक्रेता : ४२२६
 • व्यापारी : ४३५६
 • इतर व्यावसायिक : ३१३४
 • इतर स्वयंरोजगार करणारे : ५६१६
 • एकूण : १७३३२

रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्ती : ३७६६६
शेतकरी / शेतमजूर : १०६७७ 

English Headline: 
agriculture news in marathi In 2020 traders suicide cases increased
Author Type: 
External Author
संतोष शाळिग्राम : सकाळ न्यूज नेटवर्क
कोरोना corona व्यवसाय profession व्यापार आत्महत्या कर्ज विभाग sections आरोग्य health तण weed महाराष्ट्र maharashtra तमिळनाडू मध्य प्रदेश madhya pradesh पश्‍चिम बंगाल कर्नाटक उत्तर प्रदेश बेरोजगार
Search Functional Tags: 
कोरोना, Corona, व्यवसाय, Profession, व्यापार, आत्महत्या, कर्ज, विभाग, Sections, आरोग्य, Health, तण, weed, महाराष्ट्र, Maharashtra, तमिळनाडू, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बेरोजगार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In 2020 traders suicide cases increased
Meta Description: 
In 2020 traders suicide cases increased
आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, २०२० मध्ये १७ हजार ३३२ व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवाळखोरी आणि कर्जाचा बोजा अशी या आत्महत्यांमागील कारणे आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X