७ कोटी शेतकऱ्यांना दिलासा – कृषिकर्जासाठी ७ टक्यांऐवजी द्यावं लागेल फक्त ४ टक्के व्याज, कसे ते वाचा..!


नवी दिल्ली। कृषिकर्ज घेणाऱ्या देशातील ७ कोटी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून कृषि कर्जावर केवळ ४ टक्के व्याज आकारले जाणार असल्याचे स्पष्ट केलयं. केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबत माहिती दिलीय. तसेच कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत प्रेस कॉन्फरन्समध्येही माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने किसान क्रेडीट कार्ड़च्या माध्यमातून कृषिकर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचे निश्चित केले आहे. देशात लॉकडाऊन नसता तर शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेले पीककर्ज ३१ मार्चपर्यंत ७ टक्के व्याजाने परतफेड करावे लागले असते, मात्र सरकारने या कर्जफेडीची मुदत वाढवून ती ३१ मे केली होती. त्यात आता पुन्हा वाढ करण्यात आली असून ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  

सरकारने याअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजात २ टक्के आणि कर्जफेडीच्या वेळी ३ टक्क्यांचा फायदा मिळेलभारतसरकारकडून शेतकऱ्यांना ९ टक्के व्याजदराने कर्ज मिळतंयात बँकेच्या व्याजात सरकार २ टक्के सुट देईल. तसेच वेळेवर कर्ज फेडल्यास ३ टक्क्यांची सुट मिळेलअशाप्रकारे शेतकऱ्यांना ४ टक्क्याने ३ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहेअशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिलीय.

किसान क्रेडीट कार्डद्वारे कर्ज घेताना शेतकऱ्यांच्या किमान एक हेक्टर जमिनीवर दोन लाखापर्यंत कर्ज मिळते. प्रत्येक बॅंकेची कर्जमर्यादा वेगळी असती. सहकारी बॅंका, ग्रामीण बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका यासर्वांच्या माध्यमातून किसान क्रेडीट कार्ड व्दारे कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्डव्दारे शेतकरी कधीही पैसे काढू शकतात. Source link

Leave a Comment

X