[ad_1]
अमरावती : संत्रा व्यापाऱ्यांविरोधात एल्गार पुकारणाऱ्या सहा गावांतील शेतकऱ्यांकडून अहमदाबाद येथील प्राइमफ्रेश कंपनीने संत्रा खरेदीबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यासाठी कंपनीचे संचालक मधुर लोणकर व इतरांनी या भागाचा दौरा केला.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा, निमखेड, भंडाराजसह सहा गावांत संत्रा लागवड क्षेत्र आहे. या हंगामात उत्पादित संत्रा खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी आपल्या काही अटी घालून दिल्या होत्या. त्यानुसारच खरेदी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. व्यापाऱ्यांच्या या झुंडशाहीला विरोध करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी आपली नियमावली तयार केली. त्या शर्तीनुसारच संत्रा विकणार असल्याचे व्यापाऱ्यांना ठणकावत त्यांची मुजोरी मोडीत काढली. यासंदर्भात ‘ॲग्रोवन’च्या २८ ऑक्टोबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.
प्रयोगशील शेतकरी प्रवीण बेलखेडे यांच्या माध्यमातून अहमदाबाद येथील प्राइमफ्रेश कंपनीच्या संचालकांनी या वृत्ताची दखल घेतली. त्यानंतर थेट निमखेड बाजार, चौसाळा व इतर काही गावांना भेट देत संचालक मधुर लोणकर यांनी संत्रा उत्पादकांशी संवाद साधला. बाजार दरानुसार किलोप्रमाणे संत्रा खरेदीची तयारी कंपनीने दर्शविली. यासाठी विविध गावांमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात
आली.
या वेळी प्रवीण बेलखेडे, मधुर लोणकर, उमेश भाला उपस्थित होते.

[ad_2]
Source link