[ad_1]
कोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती देण्यासाठी केंद्राने पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींविषयक समितीने इथेनॉल दरात लिटरमागे दोन ते तीन रुपये वाढीस गुरुवारी (ता.२९) मंजुरी दिली. एक डिसेंबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीसाठी ही दरवाढ लागू असेल.
यंदा देशात साखरेच्या विक्रमी उत्पादनाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे केंद्राने इथेनॉलनिर्मितीकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. कारखान्यांना इथेनॉलनिर्मितीला बळ मिळावे यासाठीच केंद्राने तातडीने येणाऱ्या वर्षासाठी इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कारखान्यांकडून या वाढीव दराने इथेनॉल खरेदी करु शकतील. गेल्या दोन महिन्यांपासून तेल मंत्रालयाने इथेनॉल दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. परंतु त्यावर निर्णय झाला नव्हता. अखेर केंद्राने हालचाली करीत ही दरवाढ लागू केली.
देशातील सर्व डिस्टिलरी या दरवाढीचा लाभ घेण्यास सक्षम असतील. त्यांनी मोठ्या प्रमाणात ‘ईबीपी’ प्रोग्रामसाठी इथेनॉल पुरवठा करणे अपेक्षित आहे. देशात ज्या कारखान्यांकडे शेतकऱ्यांची थकबाकी आहे. त्या कारखान्यांना याचा लाभ व्हावा या दरवाढीचा मुख्य उद्देश असल्याचे तेल मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. प्रमुख तेल कंपन्यांनी इथेनॉलची खरेदी केल्यास इंधनाच्या आयातीचा भुर्दंडही कमी होण्याची शक्यता आहे. अनेक फायदेशीर बाबींमुळेच या दरवाढीला तातडीने मान्यता देण्यात आली.
गेल्यावर्षी ब्राझीलने साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी करुन इथेनॉलनिर्मिती केली होती. तोच पॅटर्न केंद्र सरकारही यंदा राबविण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने इथेनॉल बाबतचे प्रत्येक निर्णय यापुढे केंद्र गतीने घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१४ पासून इथेनॉलनिर्मितीबाबत केंद्रीय पातळीवरून प्रयत्न होत आहेत. गेल्या चार वर्षांत तेल कंपन्यांनी इथेनॉलचे कंत्राट ३४ कोटी लिटर वरुन १९५ कोटी पर्यंत वाढविले आहेत. यात अजूनही वाढ करण्यासाठी केंद्र पावले उचलत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एफआरपी आणि साखरेच्या विक्री किमतीतही बदल होत असल्याने इथेनॉलच्या किमतीत बदल करण्यात येत असल्याचे केंद्रीय पातळीवरून सांगण्यात आले.
अशी आहे दरवाढ
सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत लिटरला ४३.७५ वरून ४५.६९ इतकी करण्यात आली आहे. बी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ५४.२७ वरून ५७.६१ रुपये तर उसाचा रस, साखरेपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत ५९.४८ वरून ६२.४५ रुपये प्रतिलिटर करण्यात आली आहे. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमांतर्गत या दरवाढीस मान्यता देण्यात आली.

[ad_2]
Source link