[ad_1]
नाशिक : राज्याच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कळवण तालुक्यातील ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी ४ कोटी व सुरगाणा मतदारसंघात श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, अशी माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.
तब्बल ४० वर्षानंतर ओतूर धरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्रकल्पांच्या विकासकामांना गती मिळणार असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली होती. त्यानुसार तालुक्यातील सप्तश्रुंगी गडावरील पाणी टंचाई, ओतूर व श्रीभुवन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची घोषणा केली.
असे आहे कामाचे स्वरूप
ओतूर धरणाचा जुना सांडवा तोडून नव्याने काँक्रिटमध्ये सांडवा बांधण्यात येईल. नवीन धरणासाठी जुन्या धरणाचे मटेरिअल न वापरता नवीन गुणवत्तेचे साधन- साहित्य वापरण्यात येईल. नवीन ओतूर धरण पूर्ण लांबीत नव्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी ३९ कोटी २८ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. ओतूर धरणातील अवैशिष्ट कामे, शिल्लक कामे, विशेष दुरुस्ती अंतर्गत अर्थसंकल्पात विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्यात आली.
श्रीभुवन प्रकल्प नवीन असून प्रकल्पाची किंमत ३३ कोटी रुपये आहे. अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद करून प्रकल्पाच्या कामास गती मिळेल. या प्रकल्पामुळे २.४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होईल. २२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

[ad_2]
Source link