[ad_1]
औरंगाबाद : जिल्ह्यातील मका उत्पादकांकडून किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे चुकारे अखेर उत्पादकांना अदा करण्यात आले. किरकोळ त्रुटीपायी मोजक्या शेतकऱ्यांचे बाकी असलेले चुकारे अदा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात आठ केंद्रावरून किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत १७६० रुपये प्रतिक्विंटल दराने मक्याची खरेदी करण्यात आली. लक्षांक पूर्तीमुळे मुदतवाढ मिळूनही मुदतीपूर्वीच किमान आधारभूत किमतीने मक्याची खरेदी थांबली होती. त्यावेळी किमान आधारभूत किमतीने मका खरेदी करण्यासाठी नोंदणी केलेल्या ७८३२ शेतकऱ्यांपैकी ५९६६ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्याचे काम झाले.
तीन हजार ८६९ शेतकऱ्यांकडील १ लाख १४ हजार ४३६ क्विंटल मक्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली होती. त्याच्या चुकाऱ्यापोटी २० कोटी १४ लाख सात हजार ३६० रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, सुरुवातीला काही दिवस मका खरेदी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी केवळ १९३ शेतकऱ्यांनाच त्यांच्याकडील खरेदी केलेल्या ५५४५ क्विंटल मकाच्या चुकऱ्यापोटी ९७ लाख ६० हजार ८० रुपये मिळाले.
आधीच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी केला गेला नाही. त्यातच जो खरेदी केला गेला त्याच्या चुकाऱ्यालाही विलंब होत असल्याने मका उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी होती.
दरम्यान, यावर ”ॲग्रोवन”ने सातत्याने प्रकाश टाकला होता. अखेर मक्याच्या चुकाऱ्यापोटी आवश्यक असलेली सर्व रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली. जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांवर खरेदी केलेल्या मकाच्या चुकाऱ्याचे पैसे अदा करण्यात आले. काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर किरकोळ त्रुटींमुळे रक्कम अदा करण्याचे रखडलेले कामही गतीने पूर्ण करणे सुरू असल्याचेही मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले.
चालू खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन हमी दराने खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अंदाजित जिल्ह्यात विविध पिकांची किती खरेदी होऊ शकते. याविषयी माहिती कळविण्यात आली आहे. कृषी विभागाकडून उत्पादकतेसह इतर माहितीही मागविण्यात आल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले.

[ad_2]
Source link