[ad_1]
नवी दिल्ली | देशभरातील किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही महत्वाची बातमी असून जर या कार्ड व्दारे कर्ज घेतले असले तर त्याची ३१ ऑगस्टपूर्वी परतफेड करावी लागणार आहे. केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्डधारकांना (KCC) कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देते. याशिवाय या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य, खते, अवजारे यांचीही खरेदी करता येते. लॉकडाऊनच्या काळात तस सरकारने केसीसी व्दारे १० टक्के रक्कम घरगुती खर्चासाठी वापरण्याचीही परवानगी दिली आहे.
किसान क्रेडिट कार्डव्दारे कृषि कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परत फेड केली नाही तर त्यांना ४ टक्क्यांच्या ऐवजी ७ टक्के व्याज भरावे लागणार आहे. सरकारने या कर्जावर ३१ ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी दिली आहे. जर शेतकऱ्यांनी वेळेत ही रक्कम भरली नाही तर अतिरिक्त ३ टक्के अधिक व्याज द्यावे लागेल. दरम्यान किसान क्रेडिट कार्डधारकांना ३१ मार्चपर्यंत कर्ज परत करावे लागते. त्यानंतर शेतकरी पुढच्या वर्षासाठी पुन्हा पैसे घेऊ शकतो. काही शेतकरी चालू असलेले कर्ज वेळेवर परत करुन व्याजदरात सवलत मिळवत असतात आणि नंतर पुन्हा नवीन वर्षासाठी नव्याने कर्ज काढत असतात. यामुळे बँकेत शेतकऱ्यांचे व्यवहार सुरळीत चालू राहतात.
किसान क्रेडिट कार्डवर बँका कर्ज देत नाहीत अशा तक्रारी केल्या जातात. परंतु या कार्डच्या सहाय्याने कर्ज घेण्यासाठी काही अटी देखील घालण्यात येतात. कर्जासाठी अर्ज करताना आपल्याला कार्डची क्रेडिट हिस्ट्री दाखवावी लागते. म्हणजेच आपल्याकडे कोणते कर्ज थकीत नाहीत याची शाश्वती बँकेला द्यावी लागते. एकदा कर्ज घेतल्यानंतर आपला व्यवहार चांगला सुरू राहिला तर पुन्हा नवीन कर्ज मिळण्यास सुलभ जाते. लॉकडाऊन मुळे मोदी सरकारने पैसे परत करण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवली . नंतर ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने परत मुदत वाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मुदतीत घेतलेले पैसे भरल्यास त्यांना व्याज सवलत मिळणार आहे.
असे मिळवा किसान क्रेडिट कार्ड –
आपण पीएम किसान लाभ घेत असाल तर https://pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊन किसान क्रेडिटसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. जे शेतकरी या योजनेचे लाभार्थी नाहीत तेही या संकेतस्थळावर जाऊन कार्ड घेऊ शकतात. पीएम किसान या लिंकवर क्लिक केल्यानंतर समोर एक होमपेज दिसेल. त्यावर केसीसी डाऊनलोड असा एक पर्याय असेल तो निवडावा लागेल. त्यानंतर विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल. या लिंक व्यतिरिक्त तुम्ही या संकेतस्थळावरुन पीएम किसान योजनेसंदर्भात अधिक माहिती घेऊ शकता.
[ad_2]
Source link