[ad_1]
नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी (ता.२८) सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंडिया गेटवर आंदोलन केलं.
इंडिया गेट समोर एका ट्रकमधून ट्रॅक्टर आणून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७.१५ ते ७.३० च्या दरम्यान जवळपास १५ ते २० लोक कृषी कायद्याच्या विरोधात इंडिया गेटजवळ एकत्र आले. त्यांनी सोबत एक जुना ट्रॅक्टर आणला होता. त्या ट्रॅक्टरमध्ये आग लावल्यानंतर जोरदार घोषणाबाजीसुद्धा झाली.पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांकडून काँग्रेस झिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात होत्या. अग्निशमन दलाने ट्रॅक्टरची आग विझविली. यावेळी कार्यकर्त्यांजवळ शहीद भगतसिंग यांचे छायाचित्र होते.(शहीद भगतसिंग यांची आज जयंती आहे.)

[ad_2]
Source link