[ad_1]
जळगाव ः खानदेशात कलिंगडाची काढणी अनेक भागात सुरू झाली आहे. जागेवरच प्रतिकिलो सात रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. सुरवातीला दर टिकून असल्याने काहीसा लाभ होत आहे. परराज्यातील खरेदीदारही कलिंगडासाठी दाखल झाले आहेत.
कोरोनामुळे बाजार समित्यांच्या कामकाजाला फटका बसत आहे. भाजीपाल्याचे लिलाव विस्कळीत झाले आहेत. परंतु खानदेशात कलिंगडाची केळी, पपईप्रमाणे ९५ टक्के खरेदी थेट शिवारातून होते. सध्या शेतमाल वाहतूक सुरू आहे. अडचणी नाहीत. यामुळे कलिंगड खरेदीला वेग आला आहे. कमी दर्जाच्या कलिंगडास किमान चार ते पाच रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली येथील खेदीदादारांचे एजंट सक्रिय आहेत. काही स्थानिक खरेदीदारदेखील उत्तर भारतासह राजस्थान, गुजरातेत कलिंगडाची पाठवणूक करीत आहेत.
कलिंगडाची गेल्या आठ-१० दिवसांत जळगाव, धुळे जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी १८ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) आवक झाली. अनेक शेतकऱ्यांचे कलिंगड काढणीवर येत आहे. त्यामुळे आवक वाढणार आहे. सध्या ऊन तापू लागल्याने कलिंगडाची मागणीदेखील आहे. लागवड धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री, जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, जामनेर, पाचोरा या भागात अधिक झाली आहे.
केळीत कलिंगडाची लागवड
अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकात कलिंगडाची लागवड केली आहे. एकरी १७ ते १८ टन कलिंगडाचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. काही शेतकरी यापेक्षा अधिक उत्पादन साध्य करीत आहेत. दर पुढील १० ते १५ दिवस टिकून राहतील. नंतर आवक वाढेल व दरांवर दबाव वाढू शकतो, असा अंदाज आहे. कलिंगडाची बाजार समितीत फारशी आवक नाही, अशी माहिती मिळाली.

[ad_2]
Source link