[ad_1]
जळगाव ः खानदेशात बाजारात मक्याची आवक वाढली आहे. मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी असून, किमान ११०० व कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. दरात क्विंटलमागे ८० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. पण बाजारात किंवा खासगी बाजारात हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासकीय खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
मक्याची लागवड खानदेशात ज्वारीपेक्षा अधिक झाली आहे. ही लागवड सुमारे ४१ हजार हेक्टरवर झाली आहे. यात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा मका पुढील १० दिवसात मळणीवर येईल. बाजारात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण होऊन आवक सुरू झाली आहे. त्याचे दर ११०० ते १२३० रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. आवक गेल्या आठवड्यात वाढली. एकरी उत्पादन २५ ते २७ क्विंटल एवढे आहे. फारसा नफा मका उत्पादकांच्या हाती राहत नसल्याची स्थिती असली तरी दर स्थिर असल्याचा दावा बाजारातून केला जात आहे. लागवड कमी आहे. तरी दरवाढ फारशी दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
यंदा खर्च वाढला
यंदा मक्याला खर्च अधिक लागला कापणी, मळणीचा एकरी खर्च ३१०० रुपये एवढा आहे. शिवाय सुरवातीला लष्करी अळीचा अटकाव, कामगंध सापळे, खते आदी खर्च आला. त्यात शेतकऱ्याला अधिकची मेहनतदेखील करावी लागली आहे. मक्याची आवक धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, अमळनेर व जळगाव या बाजारात सुरू आहे. ही आवक गेल्या चार दिवसात चोपडा व अमळनेरात मिळून प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल एवढी झाली आहे. ही आवक आणखी वाढेल. परंतु दर स्थिर राहावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.