[ad_1]
जळगाव ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा सुमारे १६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. अजूनही अधूनमधून अनेक भागात पाऊस येत आहे. मूग, उडदाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात येत्या १० ते १२ दिवसांत काही शेतकरी पेरणी करण्याचे नियोजन करीत आहेत. रब्बीसाठी अनुकूल वातावरण खानदेशातील तापी, गिरणा, पांझरा, अनेर, गोमाई नदीकाठी आहे. कोरडवाहू क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी वाढण्याचा अंदाजही आहे.
प्रशासन किंवा कृषी यंत्रणा रब्बीसंबंधी खते, बियाण्याची तयारी करीत आहे. रब्बीमध्ये मका व हरभऱ्याचे बियाणे अधिक लागेल. कृत्रीम जलसाठे उपलब्ध असलेले शेतकरी मक्याची लागवड अधिक करतील. कारण मक्याचा हमीभाव १८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. तर, कोरडवाहू क्षेत्रात हरभऱा व त्यापाठोपाठ ज्वारीची पेरणी होईल. ज्वारीसाठी तापी नदीकाठावरील भाग प्रसिद्ध आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात कोरडवाहू ज्वारी किंवा दादरची पेरणी केली जाते.
खानदेशात यंदा सुमारे साडेचार लाख हेक्टरवर रब्बी हंगाम उभा राहू शकतो. त्यात जळगाव जिल्ह्यात दोन लाख ६० ते ६५ हजार हेक्टरवर रब्बी हंगाम असणार आहे. तर धुळ्यात सुमारे सव्वालाख आणि नंदुरबारातही एक लाख ते सव्वालाख हेक्टरवर रब्बी हंगाम उभा राहू शकतो.
हरभऱ्याची पेरणी खानदेशात मिळून सुमारे दोन लाख हेक्टरवर होवू शकते. त्यात किमान एक ते सव्वालाख हेक्टरवर कोरडवाहू क्षेत्रातील हरभरा असणार आहे. मक्याची लागवड सुमारे दीड लाख हेक्टरवर राहील. तर, सिंचनाची सुविधा असलेल्या व कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारीचे क्षेत्रही खानदेशात ७० ते ८० हजार हेक्टरवर राहू शकते.
मूग, उडदाखालील कमाल क्षेत्र पुढील आठवड्यात रिकामे होईल. मुगाचे क्षेत्र रिकामे झाले आहे. तर, उडदाची मळणी काही भागात सुरू आहे. या क्षेत्रात पूर्वमशागत करून त्यात रब्बी पिकांची पेरणी केली जाईल. तर, सोयाबीन पिकाखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रातही पेरणी सुरू होईल.
ज्वारी, हरभऱ्याची पेरणी यंदा कोरडवाहू क्षेत्रात बऱ्यापैकी होईल. कारण वाफसा कायम असून, काळ्या कसदार जमिनीत पेरणीसाठी अनुकूल स्थिती आहे.
– विकास पाटील, शेतकरी, चोपडा (जि.जळगाव)

[ad_2]
Source link