[ad_1]
गगनबावडा| महावितरण परिसरात काम करत असताना झालेल्या सर्पदंशाने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. कातळी ता. गगनबावडा येथील अकबर काशिम थोडगे (वय२७) असे त्याचे नांव आहे.
महावितरण परिसरात काम करत असताना सोमवार दि. २० रोजी त्यास सर्पदंश झाल होता. येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल केले होते. पण कोणतेती उपचार न करता त्यास कोल्हापूरला पाठविले. खाजगी रुग्णालयात आठवडाभर उपचार सुरु होते पण सोमवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, एक महिन्याचा मुलगा, आई, वडिल, भाऊ, बहिण असा परिवार आहे. घरचा कर्ता मुलगा गमावल्याने कातळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
[ad_2]
Source link