[ad_1]
पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गेल्या तीन दिवसांपासून चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज (ता.४) आणि उद्या (ता.५) पावसाची काहीशी उघडीप राहणार असून उन्हाचा चटका वाढेल. मात्र, गुरुवारपासून पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाट व गारपीटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
राज्यात दिवसभर उन्हाचा चटका आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण अशी काहीशी स्थिती राहत आहे. मध्यरात्रीनंतर पुन्हा हवेत गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात किंचित घट होत आहे. मागील दोन दिवसांत राज्यातील सर्वच भागांत ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीने अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भातही पारा चांगलाच घटल्याने कमाल तापमानात पुन्हा चांगलीच घसरण झाली आहे. सोमवारी (ता. ३) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोमोरीन परिसर व दक्षिण तमिळनाडू परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच मध्य प्रदेश व परिसरात व वायव्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तर मध्य प्रदेशचा वायव्य भाग ते मणिपूर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याशिवाय उत्तर कर्नाटक ते कोमोरिन परिसर, दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने भूपृष्टावर येत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपीटीसह जोरदार पाऊस पडत आहे.
राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस
मंगळवार ः सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.
गुरुवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ.
शुक्रवार ः संपूर्ण महाराष्ट्र.
सोमवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- मुंबई (सांताक्रुझ) ३४.५
- अलिबाग ३४.६
- रत्नागिरी ३४.३
- डहाणू ३४.३
- पुणे ३६.२
- जळगाव ४०.०
- कोल्हापूर ३५.६
- महाबळेश्वर ३१.५
- नाशिक ३५.८
- सांगली ३६.८
- सातारा ३७.१
- सोलापूर ३८.०
- औरंगाबाद ३७.८
- परभणी ३७.९
- नांदेड ३९.०
- अकोला ३८.५
- अमरावती ३६.२
- बुलडाणा ३८.०
- ब्रम्हपुरी ३५.५
- चंद्रपूर ४१.८
- गोंदिया ३७.५
- नागपूर ३७.०
- वर्धा ३७.८

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.