[ad_1]
बुलडाणा : कापूस पणन महासंघाच्या वतीने हमी भाव खरेदीसाठी जळगाव जामोद येथील श्री कोटेक्स जिनिंग फॅक्टरीमध्ये प्रारंभ करण्यात आला. यावेळी वडशिंगी येथील सहदेवराव खिरोडकार यांच्या हस्ते काटापूजन करून प्रथम कापूस आणणारे शेतकरी जानराव शामराव आटोळे व रघुनाथ राजाराम कोकाटे यांचा शेला टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील, बाजार समिती संचालक राजेंद्र देशमुख, प्रकाश
गावंडे, शहादेव सपकाळ, रामेश्वर मानकर व कापूस महासंघाचे झोनल मॅनेजर एस. व्ही. खडसे, केंद्र प्रमुख पी. व्ही. गावंडे, जिनिंग फॅक्टरी संचालक प्रमोद कुटे, बाजार समितीचे सर्व कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
मानोरामध्ये खरेदी केंद्राची मागणी
वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात कापसाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला असून, तेथे पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी बाजार समितीच्या संचालक मंडळाने तहसीलदारांमार्फत संबंधितांकडे केली आहे.
बाजार समितीने म्हटले आहे, कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. २० जुलै रोजी पणन महासंघाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता नोंदणी करण्याबाबतचे पत्रान्वये कळविले होते. त्यानुसार बाजार समितीमध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हे शेतकरी खरेदी कधी सुरू होते याकडे लक्ष देऊन आहेत.
मानोरा हा कापूस उत्पादक पट्टा असून, येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले तर मोठ्या प्रामाणात कापूस खरेदी होईल, अशी अपेक्षा निवेदनात सभापती गोविंद चव्हाण, उपसभापती राजेश नेमाने, संचालक सुनील राठोड, द्वारकादास राठोड यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री शंभुराजे देसाई, खासदार भावना गवळी, जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या
आहेत.

[ad_2]
Source link