[ad_1]
पुणे : गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकांवर चिकटा आणि मावा रोगाचे प्रमाण वाढले आहे. पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर जवळपास ४०-५० टक्केपर्यंत अधिक पिकांवर चिकट्याचा प्रादुर्भाव झाला आहे. जिरायती भागात ज्वारीचे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौड, इंदापूर, खेड, बारामती या तालुक्यात प्रामुख्याने सर्वाधिक ज्वारीची पेरणी होते. जिल्हयात सरासरी ज्वारीचे १ लाख ४५ हजार ३२७ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ९५ हजार ६१३ हेक्टर म्हणजेच ६६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी सुमारे ४० ते ५० हजार हेक्टरवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कडब्याची प्रतही ढासळण्याची चिन्हे दिसत असून, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचे दिसू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या एक ते दोन महिन्यांपासून बदलत असलेल्या हवामानामुळे ज्वारी पिकावर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या रोगामुळे प्रादुर्भावामुळे ज्वारी पिकाच्या पानांवर द्रवरूप असा पातळ चिकट थर निर्माण झाला आहे. तसेच ज्वारीच्या पानांचा रंग तांबडा व काळसर होत असून, त्यामुळे कडब्याची प्रत खराब होऊ लागली आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याचे शक्यता निर्माण झाली आहे.
या रोगामुळे ज्वारीचे उत्पादन तसेच कडब्याची प्रत ढासळणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्ट्या नुकसान होणार आहे. उत्पन्नातील घट व आर्थिक नुकसानीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
प्रतिक्रिया
माझ्याकडे सात एकर ज्वारी पीक आहे. बदलत असलेल्या हवामानामुळे चिकट्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कणसामध्ये ज्वारीचे दाणे भरले नाही. उत्पादनात घट येण्याची शक्यता असून चाऱ्याचीही अडचण होणार आहे.
भाऊसाहेब पळसकर, करर्डे, ता. शिरूर, जि. पुणे
पुण्यातील ज्वारीची झालेली पेरणी (हेक्टर)
हवेली ४३५, मुळशी १५, भोर १३,०१०, मावळ २७०, वेल्हे ६७, जुन्नर ४५००, खेड ८९७३, आंबेगाव ७७८१, शिरूर १६,८१७, बारामती २०,४८६, इंदापूर २५२१, दौड ३१६०, पुरंदर १७,७७८

[ad_2]
Source link