[ad_1]
पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे असले तरी पुढील काही दिवस राज्यातील थंडीत चढ-उतार होईल. गुरूवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे नीचांकी १०.२ अंश सेल्सिअसची सर्वांत किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मागील तीन ते चार दिवस उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली होती. यामुळे राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. सध्या आकाश निरभ्र झाल्याने राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. खानदेश व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत
खाली आला आहे.
राज्यात पुणे, निफाड, नाशिक, नगर, जळगाव भागात थंडी अधिक आहे. त्यातुलनेत कोकणात किंचित थंडी असून किमान तापमानाचा पारा १८ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मुंबई परिसरात बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली असून किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोला भागात थंडी आहे. यामुळे किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
गुरूवारी (ता.२१) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रुझ) १८.२ (१)
- रत्नागिरी १९.३ (१)
- पुणे १३.९ (३)
- कोल्हापूर १९.० (४)
- महाबळेश्वर १३.४
- मालेगाव १४.६ (४)
- नाशिक ११.४ (१)
- सांगली १८.४ (४)
- सातारा १६.० (४)
- सोलापूर १८.४ (२)
- औरंगाबाद १५.५ (३)
- बीड १७.३ (३)
- परभणी १७.५ (३)
- नांदेड २०.० (६)
- उस्मानाबाद १६.८ (२)
- अकोला १५.७ (१)
- अमरावती १७.५ (३)
- बुलडाणा १५.५ (१)
- चंद्रपूर १७.८ (३)
- गोंदिया १४.० (१)
- नागपूर १६.० (४)
- वर्धा १६.७ (३)
- यवतमाळ १६.५ (१)

[ad_2]
Source link