[ad_1]
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५८ गावांतील गावठाणांच्या जमीन मोजणीस ड्रोनच्या सहाय्याने सुरुवात करण्यात आली. सर्व्हे ऑफ इंडियाच्या वतीने हे काम करण्यात येत असल्याचे उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद जरग यांनी सांगितले.
येळेगाव येथील सीमांकन करून या कामाची सुरुवात करण्यात आली. ३१ एप्रिलअखेर तालुक्यातील ५८ गावांची मोजणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जरग यांनी सांगितले. गावठाण भूमापन योजना यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे सीमांकन चुना पावडरच्या साहाय्याने वेळेवर करून घ्यावे. सार्वजनिक मिळकती आणि रस्त्याच्या हद्दीचे संरक्षण होण्यासाठी ग्रामविकास, भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, योग्य माहिती पुरवावी, असे आवाहन ही जरग यांनी केले आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी, असे आवाहनही जरग यांनी केले आहे.
मोजणी करण्यात येणारी गावे
अकोले मंद्रूप, अंत्रोळी, आलेगाव आहेरवाडी, औज आहेरवाडी, इंगळगी, खानापूर, उळेवाडी, गावडेवाडी, कर्देहळ्ळी, कणबस, कुडल, तेलगाव मंद्रूप, गुंजेगाव, चंद्रहाळ, चिंचपूर, लिंबी चिंचोळी, तिर्थ, तिल्लेहाळ, तोगराळी, दर्गनहळ्ळी, दिंडुर, दोड्डी, नांदणी, बंकलगी, बंदलगी, बरूर, बाळगी, बिरनाळ, बोळकवठे, बोरूळ, मनगोळी, कुरघोट, मंद्रे, यत्नाळ, येळेगाव, राजूर, रामपूर, लवंगी, वरळेगाव, वडापूर, वडगाव, वडकबाळ, वडजी, वांगी, सिंदखेड, शिर्पनहळ्ळी, शिरवळ, संगदरी, संजवाड, सादेपूर, सावतखेड, हत्तरसंग, हिपळे, बक्षीहिप्परगे, होनमुर्गी, औज मंद्रूप, कारकल, कुसूर.
ग्रामस्थांसाठी सूचना
- ग्रामसभेत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
- ग्रामपंचायत अभिलेख्यामध्ये मिळकती संदर्भात नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात.
- ग्रामसेवकास संपर्कासाठी मोबाइल क्रमांक द्यावा.
- गावातील मिळकतधारकांना माहिती द्यावी.
- मिळकतीचे योग्य ते सीमांकन करून घ्यावे.
- सीमांकनाबाबत वाद असल्यास ही बाब ग्रामसेवक, भूमापक
- यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
- सार्वजनिक, शासकीय आणि ग्रामपंचायत मिळकतींचे सीमांकन करण्यास सहकार्य करावे.
- सार्वजनिक मालमत्तेवर कोणी हक्क सांगत असल्यास कळवावे.
- मालकी हक्काच्या चौकशीवेळी पुराव्याची कागदपत्रे सादर करावी.
- न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती द्यावी.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.