[ad_1]
नांदेड : दोन-तीन दिवसांच्या उघडीपीनंतर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२३ मंडळांमध्ये गुरुवारी (ता.२७) सकाळपर्यंत २४ तासांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.
गेली दोन, तीन दिवस पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आंतरमशागत, फवारणी, मूग काढणीच्या कामांनी वेग घेतला होता. परंतु, बुधवारी (ता.२६) परत अनेक मंडळांत पाऊस झाल्यामुळे शेती कामे खोळंबली. नांदेड जिल्ह्यातील ६८ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड, लोहा तालुक्यातील मंडळामध्ये चांगला पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातील ३२ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, पूर्णा तालुक्यात पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील २३ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.
मंडळनिहाय पाऊस (मि.मी)
नांदेड जिल्हा ः विष्णुपुरी १५.५, लिंबगाव ११.५, लोहा १७.५, माळाकोळी १०.५, कापसी १७.५, सोनखेड २४.५, शेवडी १७.५, कलंबर १७.५.
परभणी जिल्हा ः परभणी २१, परभणी ग्रामीण १६.६, झरी १६.६, पिंगळी ६४.८, पालम १२.८, पूर्णा २५, ताडकळस १५.६, लिमला १५.६, कात्नेश्वर २१.८.
हिंगोली जिल्हा ः हिंगोली ७, हयातनगर ३४.३.

[ad_2]
Source link