[ad_1]
नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील गाळप हंगाम आटोपला आहे. २६ साखर कारखान्यांनी ९४ लाख २८ हजार १८५ टन उसाचे गाळप केले. तर ९३ लाख ९९ हजार २६३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले, अशी माहिती साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १८ खासगी, तर आठ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. परभणी जिल्ह्यातील रेणुका शुगरपासून हंगाम सुरु झाला. तर शेवट बळिराजा साखर कारखान्याचा पट्टा पडून झाला. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ असल्याची माहिती मिळाली.
गाळप, उताऱ्यात बळिराजा अव्वल
नांदेड विभागात सर्वाधिक गाळप व साखर उताऱ्यात परभणी जिल्ह्यातील बळिराजा, कानडखेड (ता. पूर्णा) हा खासगी कारखाना अव्वल ठरला आहे. या कारखान्याने हंगामाअखेर सहा लाख ७९ हजार २४६ टन उसाचे गाळप करून सात लाख ७२ हजार ५०८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर या कारखान्याचा साखर उतारा ११.३७ टक्के आला आहे. हा उतारा विभागात सर्वाधिक आहे.
या सोबतच गंगाखेड शुगर कारखान्याने चार महिन्यांत सहा लाख २८ हजार ५५७ टन उसाचे गाळप करून साखरेचे उत्पादन सहा लाख ४८ हजार ९०० क्विंटल केले आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.