[ad_1]
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (ता.१०) दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा जोर दिसून आला. त्यात प्रामुख्याने निफाड, सिन्नर व सटाणा तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद सटाणा तालुक्यातील मुल्हेर मंडळात (७२ मिमी) झाली. निफाड तालुक्यातील ओझर मंडळात (५३ मिमी), तर सिन्नर तालुक्यातील वावी मंडळात (४७ मिमी) पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले. परिणामी, काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसात जिल्ह्याच्या पूर्व भागातील लगतच्या तालुक्यामध्ये जोर अधिक होता. यासह निफाडसह चांदोरी, सायखेडा,रानवड, नांदूर मधमेश्वर, पिंपळगाव बसवंत परिसरात पावसाने हजेरी लावली. अनेक भागात द्राक्ष भागातून पाणी वाहिले.यासह सिन्नर सह ग्रामीण भागात पांढुर्ली, नांदूर शिंगोटे, तर पूर्व भागात वावी, देवपूर भागात जास्त पाऊस होता.
सटाणा तालुक्यात मुल्हेर परिसरात मुसळधार पाऊस झाला. तसेच विरगाव, ताहाराबाद, डांगसौंदाणे या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागात प्रामुख्याने भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्यात पालेवर्गीय भाज्यांमध्ये मेथी व कोथिंबिरीचे नुकसान झाले.
पेठ तालुक्यामध्ये जोगमोडी व कोहोर मंडळात मध्यम पाऊस झाला. कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अभोना, कणाशी, दळवट परिसरात पावसाने हजेरी लावली. चांदवड तालुक्यातील पश्चिम भागात वडनेर भैरव परिसरात पावसाचा जोर होता. इगतपुरी, सुरगाणा, देवळा व त्र्यंबकेश्वर मालेगाव तालुक्यात पावसाचा जोर कमी राहिला. नाशिक व दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. येवला व नांदगाव तालुक्यात पावसाने उघडीप दिली.
कांदा लागवडीवर परिणाम
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी मका, बाजरी, कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. त्यात लेट खरीप व उन्हाळ कांद्याचे रोप खराब होत आहे. त्यामुळे आगामी कांदा लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

[ad_2]
Source link