[ad_1]
फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे जमीन दबली जाते. यामुळे मातीची रचना बिघडते. जमीन कडक होते.फळबागेतील जमीन सुधारणेसाठी व्हायब्रेटिंग सब सॉयलरचा वापर फायदेशीर ठरतो.
सब सॉयलर
- सब सॉयलरला हा जमिनीच्या पृष्ठभागाखालून १.५ ते २ फूट चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट लांबीचा असतो. जमिनीत जाणारी मांडी ही २.५ फुटांची असते.पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी सब सॉयलरचा वापर आवश्यक आहे.
- हलक्या व कमी खोलीच्या जमिनीत १.५ फूट खोलीपर्यंत सब सॉयलर चालवावा. भारी, खोल जमिनीत १.५ ते २ फूट खोलीपर्यंत सब सॉयलर चालतो. नांगरटीपूर्वी ५ फूट अंतरावर सब सॉयलर चालवावा. सब सॉयलरने ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीनुसार १.५ ते २ फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते.
- जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट थर फोडला जातो, त्यामुळे जमिनीत हवा भरून माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते. जमिनीस वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते, त्यामुळे जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते.
- सब सॉयलरमुळे जमिनीतील जास्तीचे पाणी व क्षाराचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते.
- सब सॉयलर चालविण्यासाठी डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी चांगला असतो. जमिनीमध्ये असणारी पाण्याची पाइपलाइन, विजेची वायर असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावे. ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सब सॉयलरचा वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी, जमिनीलगत छाटलेली असावी. सब सॉयलर २ ते ३ वर्षांतून एकदा वापरावा.
- सब सॉयलरचा वापर केलेली जमीन ८ ते १५ दिवस उन्हामध्ये तापून त्यानंतरच पुढील मशागत करावी.
व्हायब्रेटिंग सबसॉइलर
- फळबागा,द्राक्ष बागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे जमीन दबली जाते. मातीची रचना खराब होते. पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येतात. या अडचणी लक्षात घेऊन फळबागेतील जमीन सुधारणेसाठी व्हायब्रेटिंग सब सॉयलरचा वापर करावा. याच्या वापराने जमिनीतील घट्ट झालेला मातीचा थर फोडला जातो. जमीन मोकळी होते.
- जमिनीतील पाणी आणि खनिजे वनस्पतीच्या मुळाच्या खोलीत आणि पावसाचे पाणी आणि सिंचनाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. त्याचा पीक वाढीस फायदा होतो. याच्या वापराने जमिनीत ओलावा टिकून रहातो.
- हे यंत्र चालविण्यास सोपे आहे. कमी अश्वशक्ती लागते.
चीझल नांगर
मर्यादित खोलीवर नांगरटीसाठी हा नांगर उपयुक्त आहे. याच्या वापराने घट्ट झालेली जमीन मोकळी केली जाते.
नांगराचा वापर करताना जमिनीवर फारसा दाब येत नाही. जमिनीतील कठीण थर लगेच मोकळा केला जातो.
हा नांगर जमिनीत १५ सें.मी. ते ४६ सें.मी. खोलीपर्यंत चालतो.
– वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४
(विषय विशेषज्ञ (कृषी शक्ती व अवजारे अभियांत्रिकी) कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

[ad_2]
Source link