[ad_1]
अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी दोन-दोन महिने वेतन मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. राज्यातील इतर कृषी विद्यापीठांना वेळेत अनुदान, वेतन दिले जात असताना या विद्यापीठाला मात्र आर्थिक कोंडीत पकडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून होत आहे. हा प्रकार नेमका कुणाच्या आदेशावरून तर होत नाही ना, या बाबत सध्या उलटसुलट चर्चा आहेत.
विदर्भातील ११ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी मागील काही दिवसांपासून अनियमित वेतनामुळे त्रस्त आहेत. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारीही तर वेळेवर वेतन मिळत नसल्याने विद्यापीठात चौकशी करून थकले. या बाबत माहिती घेतली असता शासनाकडून अनुदान वितरित करताना विलंब होणे, कमी प्रमाणात अनुदान देणे, असे प्रकार सुरू आहेत. वेळेवर अनुदान दिले जात नसल्याने वेतन विलंबानेच नव्हे तर दोन-दोन महिने होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यांचे वेतन सोमवार (ता. १४) पर्यंतही अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळालेले नव्हते. जाणीवपूर्वक या विद्यापीठाला अनुदान विलंबाने दिले जात तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.
जीपीएफबाबतही हा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये वेतन वेळेवर दिले जाते. अनुदानही मिळते आहे. असे असताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठावर नेमके कोण ‘नाराज’ आहे, हे स्पष्ट झालेले नाही. कुणाच्या सूचनेवरून हा प्रकार घडवून आणला जात आहे, या बाबत अधिकारी, कर्मचारी उलटसुलट चर्चा करीत आहेत.
आम्ही शेतकऱ्यांसाठी विद्यापीठात संपूर्ण आयुष्यभर इमानेइतबारे सेवा दिली. आता सेवानिवृत्त म्हणून जगत आहोत. सेवानिवृत्तीचे वेतन हाच आमचा उदरनिर्वाहाचा आधार आहे. हे वेतनच वेळेवर दरमहा मिळत नसल्याने काय करावे, अशी परिस्थिती ओढवलेली असल्याचे एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सांगितले. तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळत नसल्याने विद्यापीठाच्या लेखा विभागाला संघटनांच्या रोषाला नाहक बळी पडावे लागत आहे. वेतन, अनुदानाबाबत अधिकाऱ्यांना काय उत्तर द्यावे, असा पेच या विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर उभा राहत आहे. संघटनांनी वेतनासाठी विद्यापीठ प्रशासनाला अनेक निवेदनेही
दिली आहेत.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.