[ad_1]
परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेअंतर्गत सात तालुक्यांतील २२७ अपात्र (आयकरदात्या) लाभार्थींकडून अनुदानाची २२ लाख ६ हजार रुपये रक्कम परत करण्यात आली, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
कृषी सहाय्यक, तलाठी यांच्यामार्फत योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४ लाख ६४ हजार ७८३ शेतकरी खातेदार आहेत. त्यातून पीएम किसानसाठी प्राथमिक पात्रताधारक ३ लाख ९ हजार ३५३ शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी ६ हजार ६७० शेतकऱ्यांनी नावे स्वतः अपलोड केली. त्यांना मंजुरी देणे बाकी आहे.
एकूण ३ हजार ८६३ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकात चुका आहेत. त्यामुळे ती प्रकरणे प्रलंबित आहेत. तर, २ हजार ४२ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अवैध आहेत. एकूण २३ हजार २३६ शेतकऱ्यांची माहिती दुरुस्तीसाठी उपलब्ध आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आजवर प्रत्येकी दोन हजार रुपयाचे सहा हप्ते जमा करण्यात आले. त्यामध्ये २ लाख ९० हजार ३५५ लाभार्थींच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला. दुसरा हप्ता २ लाख ७७ हजार ३०२ लाभार्थींच्या खात्यांवर, तिसरा हप्ता २ लाख ८० हजार ९० लाभार्थींच्या, चौथा हप्ता २ लाख ३७ हजार ४९३ लाभार्थींच्या, पाचवा हप्ता १ लाख ९७ हजार ४१ लाभार्थींच्या, सहावा हप्ता ८८ हजार ६३१ लाभार्थींच्या खात्यांवर जमा करण्यात आला.
दरम्यान, जिल्ह्यातील नऊ तालुक्यात एकूण ४ हजार ६७८ लाभार्थी आयकर दाते तसेच अन्य ६३ लाभार्थी अपात्र असल्याचे आढळून आले. त्यांच्या खात्यांवर ४ कोटी २४ लाख १६ हजार रुपये जमा करण्यात आले. अपात्र असल्यामुळे त्यांना खात्यावर जमा झालेली अनुदानाची रक्कम सरकारला परत करण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या.

[ad_2]
Source link